BRS In Maharashtra : तेलंगणातील शेतकरी आत्महत्या शून्यावर, आता महाराष्ट्राची स्थिती बदलण्यासाठी सर्व निवडणुका लढणार; 'बीआरएस'चा एल्गार...

K Chandrashekhar Rao : नागपूरात केसीआर यांचा फडणवीसांना आव्हान..
K Chandrashekhar Rao
K Chandrashekhar RaoSarkarnama
Published on
Updated on

Nagpur News : तेलंगणा या राज्यापेक्षा कितीतरी अधिक नैसर्गिक संसाधने महाराष्ट्र राज्यात आहेत. पण, तरीही महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या सर्वात जास्त आत्महत्या घडतात. शेतकऱ्यांची हीच परिस्थिती बदलण्यासाठी आमचा पक्ष महाराष्ट्रातील सर्व निवडणुका लढवणार आहे, असे म्हणत तेलंगणचे (Telangana News) मुख्यमंत्री आणि भारत राष्ट्र समितीचे (बीआरएस) सर्वेसर्वा के. चंद्रशेखर राव (K Chandrashekhar Rao) यांनी एल्गार पुकारला आहे.

महाराष्ट्रात सत्ता मिळाली तर येथे कृषी मॉडेल लागू करणार आहोत. यातून शेतकऱ्यांचे जीवनमान उंचवणार, हे आमचे ध्येय आहे. यानंतर मध्य प्रदेशमध्ये पक्षाचा विस्तार करू, अशी घोषणा के. चंद्रशेखर राव यांनी केली. काल (दि.१६ जून) ते उपराजधानी नागपूर येथे बोलत होते.

K Chandrashekhar Rao
Dispute in BJP-Shivsena: युतीत पुन्हा मिठाचा खडा नको; सेना-भाजपने घेतला मोठा निर्णय

भारत राष्ट्र समिती आता महाराष्ट्रात पक्षाच्या विस्तारासाठी मैदानात उतरली असून, कंबर कसून कामाली लागली आहे. नागपूरातील कविवर्य सुरेश भट सभागृह येथे बीआरसचा कार्यकर्ता संबोधन मेळावा व पक्षप्रवेशाचा कार्यक्रम (दि.१५ जून ) पार पडला. याच कार्यक्रमामध्ये राव पक्षाच्या धोरणाबाबत कार्यकर्त्यांना संबोधित करत होते. विदर्भातील ग्रामीण भागातून आलेल्या तरूण कार्यकर्त्यांनी सभागृह पुर्ण क्षमतेने भरले होते. कार्यक्रमापूर्वा राव यांनी नागरपूरातील पक्षाच्या पहिल्या कार्यालयाचे उद्घाटन केले.

भारतात सुपीक जमीन आहे, पाण्याची मोठी उपलब्धता आहे. मोठी लोकसंख्या आहे. स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तरी नंतरही शतकऱ्यांना पाण्याची वीजेची टंचाई आहे. शहरातसुद्धा पिण्याचं शुद्ध पाणी उपलब्ध होत नाही. शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी नाही. राजधानी दिल्लीसारख्या शहरात चोवीस तास वीज मिळू शकत नाही. भारताच्या अनेक भागात कुपोषणाची गंभीर प्रश्न आहे. हीच परिस्थिती बदलण्यासाठी बीआरएस पुढे येत आहे. याची सुरूवात महाराष्ट्र राज्यातून झाली आहे. महाराष्ट्रातील सर्व स्तरातील निवडणुका लढवले जाईल, असे राव यांनी स्पष्ट केले.

K Chandrashekhar Rao
KCR Skips Opposition Meet: एकजुटीपूर्वीच विरोधी पक्षात फाटाफूट; केसीआर यांनी घेतला मोठा निर्णय..

तेलंगणात शेतकरी आत्महत्या शून्य :

मराठवाड्यातील नांदेडमंध्ये आमची सभा झाली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला उद्देशून म्हंटले होते की, तुमचे महाराष्ट्रात काय काम आहे? यावर मी म्हणतो की, तेलंगण मॉडेल महाराष्ट्रात राबवा मी इथून निघून जाईन. तेलंगण राज्यात तलाठी हे पद रद्द केले आहे. सर्व काही ऑनलाईन केलं आहे, असे के चंद्रशेखर राव म्हणाले.

तेलंगणातील शेतकऱ्यांना सात-बारासाठी कुठेही जाण्याची गरज पडत नाही. शेतकऱ्यांना चोवीस तास मोफत वीज दिली आहे. शेतकऱ्यांचे सर्व उत्पादन हे सर्व राज्य सरकार पूर्णपणे खरेदी करते. शेतकऱ्यांना पाच लाखांचा विमाही सरकारकडून काढून दिला आहे. या सर्व सरकारच्या उपाययोजनांमुळे तेलंगणातील शेतकरी आत्महत्या आता शून्यावर आले आहे, असाही दावाही राव यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com