BRS News : विदर्भातील नेत्यांनाही केसीआरची भुरळ, तुमसरचे माजी आमदार बीआरएसमध्ये दाखल !

Charan Waghmare : मीसुद्धा त्यांच्याशी भेटून प्रभावित झालो होतो.
Charan Waghmare with KCR.
Charan Waghmare with KCR.Sarkarnama

Bhandara District's Charan Waghmare's News : चंद्रशेखर राव यांच्या बीआरएस पक्षाची विदर्भातील अनेक माजी आमदारांना भुरळ पडली आहे. तेलंगणातील विकास पाहून तुमसर-मोहाडी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार चरण वाघमारे हेसुद्धा बीआरएसपी पक्षाच्या संपर्कात होते. महाराष्ट्रासह जिल्ह्यातही अशा विकासाची पाळेमुळे रुजवावी, यासाठी चंद्रशेखर राव यांच्या संपर्कात असलेले माजी आमदार चरण वाघमारे यांनी भारत राष्ट्र समितीमध्ये प्रवेश केला. (This too was in touch with the BRSP party)

हैदराबाद येथील मुख्यमंत्री केसीआर यांच्या शासकीय निवासस्थानी काल माजी आमदार वाघमारे यांनी कार्यकर्त्यांसह भारत राष्ट्र समितीमध्ये प्रवेश केला. नवभारत निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठेवून, प्रत्येक भारतीय नागरिकाला त्याचा मूलभूत हक्क मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे, हे या पक्षाचे मूळ उद्दिष्ट असल्याने या पक्षाचा झेंडा हाती घेतला असल्याचे वाघमारे यांनी सांगितले.

चंद्रशेखर राव यांनी नांदेडला सभा घेतली तेव्हा त्यांनी तेलंगणात शेतकऱ्यांचा विकास कसा झाला, त्यांच्या योजना कशा पद्धतीने राबवल्या गेल्या, हे त्यांनी नांदेडच्या सभेत सांगितलं. मीसुद्धा त्यांच्याशी भेटून प्रभावित झालो होतो, त्यामुळे मी या पक्षासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे, असेही चरण वाघमारे म्हणाले.

महागाईच्या तुलनेत शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव मिळत नाही. निघणारे पीक परवडणारे नाही. मात्र तेलंगणा सरकार अशा शेतकऱ्यांसाठी वरदान ठरेल, अशा योजना सातत्याने राबवीत आहेत. त्यामुळे मीसुद्धा बीआरएसच्या संपर्कात आहे. तसाही मी स्वतंत्र आहे. त्यामुळे जो शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा राहील, त्यांच्यासोबत जाण्यास काहीच हरकत नाही, असे मला वाटते. नव्हे तर बीआरएससोबत गेलेच पाहिजे, असे वाघमारे यांनी सांगितले.

Charan Waghmare with KCR.
Nagpur APMC Election : युती-आघाडीने बिघडविले प्रस्थापितांचे गणित, रामटेक, कुही, पारशिवनीत मतदान सुरू !

तेलंगणासारख्या योजना महाराष्ट्र राज्यात का राबवल्या जात नाही, असा प्रश्न माझ्याही मनात येतो. तेलंगणातील शेतकऱ्यांचा विकास कसा झाला, हे या राज्यातील लोकांना सांगणं गरजेचं आहे. महाराष्ट्रात भारत राज्य समिती म्हणजे बीआरएसला प्रतिसाद मिळत आहे,

तेलंगणा सरकार शेतकरी (Farmers) हिताचे निर्णय घेते, त्यामुळे सामान्य माणसाचा विकास कसा साधता येईल, यासाठी विदर्भातील माजी आमदार वाघमारे यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या संपर्कात राहून अभ्यास केला आणि विकासासाठी या पक्षाची धुरा हाती घेत असल्याचे ते म्हणाले.

Charan Waghmare with KCR.
Tiosa APMC : ...म्हणून यशोमती ठाकूर यांचे राष्ट्रवादीसोबत फिसकटले !

चरण वाघमारे हे भाजपचे (BJP) आमदार म्हणून ओळखले जायचे. २०१९ ला भाजपने तिकीट कापल्याने अपक्ष विधानसभा लढवून दुसऱ्या क्रमांकाची मते त्यांनी घेतली होती. २०२३ला तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री (Chief Minister) तथा भारत राष्ट्र समिती पक्षाचे (BRS) संस्थापक अध्यक्ष यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन त्यांनी पक्ष प्रवेश केला आहे. २०२४ला महाराष्ट्र (Maharashtra) विधानसभा निवडणुकीत भारत राष्ट्र समिती पक्षाच्या तिकिटावर मैदानात उतरण्याची तयारी चरण वाघमारे यांनी सुरू केली आहे. त्यामुळे आपल्या अनेक समर्थकासह चरण वाघमारे यांनी पक्षप्रवेश केला.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com