Budget Session: एकनाथ खडसेंनी सांगितलं भूषण देसाईंचे शिंदे गटात जाण्याचे कारण, केला 'हा' गंभीर आरोप !

BJP : ४० आमदार भाजपकडे आले तेव्हापासून त्यांचेच लाड पुरवले जात आहेत.
Eknath Shinde
Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

Eknath Khadse News : उद्धव ठाकरे यांचे खंदे समर्थक राज्याचे माजी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांचे चिरंजीव भूषण यांनी शिवसेनेत (एकनाथ शिंदे) प्रवेश केला. या घडामोडीची चर्चा राज्याच्या राजकारणात चवीने केली जात आहे. आज विधानपरिषदेत ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी हा मुद्दा उपस्थित केला आणि भूषण देसाईंचे शिंदे गटात जाण्याचे कारण सांगितले. (Bhushan Desai's reasons for joining the Shinde group were explained.)

अर्थसंकल्पावर भाषण करताना एकनाथ खडसे म्हणाले, ४० आमदार भाजपकडे आले आणि सत्तांतर झाले. तेव्हापासून त्यांचेच लाड पुरवले जात आहेत. जीएडीकडे मुख्यमंत्र्यांचे भरपूर पत्र आहेत, त्यामध्ये कोट्यवधी रुपयांच्या कामाला मंजुरी द्यावी, असाच उल्लेख आहे. त्यांनी येवढी पत्र दिली की, नंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना कामे (त्यांनीच सांगितलेली) मंजूर करू नये, असे पत्र काढावे लागले.

अतिशयोक्ती केल्यामुळे ही स्थिती त्यांच्यावर आली. अर्थसंकल्पात त्यांनी केवळ घोषणा करण्याचे काम केले. त्या पूर्ण होणार नाही, अशीच शक्यता आहे. माझ्या जिल्ह्यात ९३३ कोटी मंजूर केले, तरतूद फक्त १३० कोटीची केली. फक्त मंजुऱ्या देत राहायच्या यामुळे कामांचे वर्ष वाढणार आहेत. मग सुधारीत प्रशासकीय मान्यता देण्याचे काम सुरू होईल.

फक्त मंजुरी द्यायची आणि तरतूद करायची नाही आणि केवळ निवडणूक काढायच्या. येवढाच अजेंडा हे सरकार राबवीत आहे. लग्नाची जी असते, ती लग्नाचीच असते. एका राजाच्या दोन राण्या होत्या एक आवडती एक नावडती, अगदी तसाच प्रकार सध्या आमदारांसोबत केला जात असल्याचा घणाघाती आरोप एकनाथ खडसे यांनी केला.

Eknath Shinde
Eknath Khadse News : महापालिकांमधील नामनिर्देशीत सदस्य संख्येत वाढ भ्रष्टाचारासाठी ?

आपल्या लोकांना सांभाळून घ्यायचे आणि जे त्रास देतात त्यांच्या मागे तपास यंत्रणा लावायच्या. हे काम सुरू आहे, हे आता कुणालाही सांगण्याची गरज नाही. भूषण देसाईंनी पिता सुभाष देसाईंची साथ सोडली आणि शिंदे गटात गेले. यामागचे कारण असे आहे की, भूषणने एमआयडीसीचे काम सांभाळले आहे. भूषण देसाईंनी ४ लाख १४०० चौरस मीटर औद्योगिक जमिनी रहिवासी प्रयोजनासाठी वापरली. ४०० हेक्टरच्या वर म्हणजे १००० एकरच्या वर ही जमीन आहे.

भाजप नेते अतुल भातखळकर आणि खासदार इम्तियाज जलील यांनी यामध्ये घोटाळ्याचा आरोप केला. त्यानंतर हायरॉवर समिती स्थापन करण्यात आली. दरम्यान भूषण देसाई शिंदे गटात आले. पण आता हा अहवाल सभागृहात मांडण्यात येणार आहे का, असा प्रश्‍न खडसेंनी केला. भूषणला सांगण्यात आले की तुझ्यावर ईडी लागेल आणि मग ते शिंदे गटात गेले आणि आता ती चौकशी थांबली.

Eknath Shinde
Eknath Khadse : खडसेंचा दणका; विधानपरिषदेत प्रश्न उपस्थित करताच अन्न व औषध प्रशासन अॅक्शन मोडवर

हे सांगताना माझा घोटाळा अर्धा एकर जागेचाच होता. हा ४०० हेक्टरचा घोटाळा आहे. पण शिंदे (Eknath Shinde) आणि फडणवीसांच्या आश्रयाला आला आहे. एकनाथ खडसे (Eknath khadse) राष्ट्रवादीत (NCP) गेल्यामुळे त्याच्या मागे सर्व एजंसी लावल्या. त्या व्यवहाराशी माझा रुपयाचा संबंध नाही. माझा न्याय भूषण देसाईला लावणार आहात का कारण ती तुमच्या भातखळकरांचीच (Atul Bhatkhalkar) मागणी आहे, असेही एकनाथ खडसे म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com