Buldana Samruddhi Mahamarg Accident : मृतांमध्ये नागपूर, वर्ध्याच्या १२ जणांचा समावेश, डीएनए टेस्टींगनंतर पटणार मृतांची ओळख !

Accident : त्यानंतरच मृतदेह कुटुंबीयांच्या स्वाधीन करता येणार आहे.
Buldhana Accident
Buldhana AccidentSarkarnama
Published on
Updated on

Vidarbha Travels bus met with a terrible accident : समृद्धी महामार्गावर बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा नजीक आज (ता. १ जुलै) पहाटे दीड वाजताच्या सुमारास विदर्भ ट्रॅव्हल्सच्या बसचा भीषण अपघात झाला. यामध्ये बसमधील २५ प्रवाशांचा जागीच होरपळून मृत्यू झाला. (25 passengers in the bus died on the spot)

या अपघातानंतर समाजमन हेलावून गेले आहे. अपघातानंतर बस उलटली आणि पेट घेतला. यामध्ये २५ प्रवाशांचा जागीच कोळसा झाला. एकही मृतदेह ओळखता येत नाही. अशा परिस्थितीत केवळ डीएनए टेस्टींगनंतरच मृतांचा ओळख पटणार आहे. त्यानंतरच मृतदेह कुटुंबीयांच्या स्वाधीन करता येणार आहे.

मृत पावलेल्यांमध्ये नागपूरचे आयुष गाडगे, कौस्तुभ काळे, कैलास गंगावणे, इशांत गुप्ता, गुडीया शेख, तर वर्ध्याचे अवंती पोहनकर, संजीवनी गोटे (अल्लीपूर), प्रथमेश खोडे, श्रेया वंजारी, वृषाली वनकर, ओबी वनकर, शोभा वनकर यांचा समावेश आहे. ही माहिती आपत्ती बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली आहे.

नागपूर आणि वर्धा येथून मृतांचे कुटुंबीय घटनास्थळाकडे निघालेले आहेत. पण तेथे पोहोचल्यानंतर त्यांच्या दृष्टीस केवळ कोळसाच पडणार आहे. मृतांची ओळख पटणे केवळ अशक्य आहे. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घटनास्थळी पोहोचलेले आहेत.

Buldhana Accident
Sanjay Raut on Buldhana Accident: समृद्धी महामार्ग शापित, पण याच्या खोलात जावं लागेल...; संजय राऊतांचे मोठं विधान

विदर्भ (Vidarbha) ट्रॅव्हल्सची बस क्रमांक एमएच २९ बी ई १८१९ ही नागपूर (Nagpur) वरुन पुणेकडे (Pune) जात होती. अपघातानंतर पेट घेतल्याने महाविद्यालयीन विद्यार्थिनी आणि लहान मुलांचासुद्धा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला. विदर्भ ट्रॅव्हल्स कारंजा येथे जेवणासाठी थांबली होती. त्यानंतर कारंजाजवळ असलेल्या इंटरचेंजवरुन समृद्धी महामार्गावर पुण्याला जाण्यासाठी मार्गस्थ झाली होती. त्यानंतर काहीच वेळात हा भीषण अपघात झाला.

Edited By : Atul Mehere

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com