Samrudhhi Mahamarg Accident : बुलढाण्यातील अपघात कशामुळे टायर फुटल्यानं की चालकाचे नियंत्रण सुटल्याने ? ; अहवालात..

Accident at Samruddhi Mahamarg : हा अपघात कशामुळे झाला ? याबाबत नागपूर परिवहन विभागानं अहवाल दिला आहे.
Accident at Samruddhi Mahamarg
Accident at Samruddhi Mahamarg Sarkarnama
Published on
Updated on

Buldhana accident News updates : बुलढाण्यात समृद्धी महामार्गावर विदर्भ ट्रॅव्हल्सचा शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास भीषण अपघात झाला. यात २५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला आहे. डिझेल टाकीचा स्फोट झाल्याने बसला भीषण आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. य अपघाताबाबत मोठी अपडेट समोर येत आहे. हा अपघात कशामुळे झाला ? याबाबत नागपूर परिवहन विभागानं अहवाल दिला आहे.

या अपघाताच्या वेळी बसमध्ये 30 प्रवाशी होते. पाच जखमींवर उपचार सुरु आहेत. या अपघातात बसचे चालक आणि वाहक हे बचावले आहेत. या दोघांना सध्या पोलीसांनी ताब्यात घेतले असल्याची माहिती राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी दिली.

Accident at Samruddhi Mahamarg
Samrudhhi Mahamarg Accident : बुलढाण्यातील अपघाताने तरी सरकारचे डोळे उघडावेत..

बसचे टायर फुटल्यानं या बसचा अपघात झाला नसल्याची माहिती नागपूर परिवहन विभागानं दिली आहे. चालकाचं बसवरील नियंत्रण सुटल्यानेचं दुर्घटना झाला असे नागपूर परिवहन विभागाने दिलेल्या अहवालात म्हटलं आहे.

या अपघातील मृतांच्या नातेवाईकांना राज्य सरकारकडून पाच लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. तर जखमींवर सरकारकडून उपचार करण्यात येत आहेत. तर केंद्र सरकारकडून मृतांच्या नातेवाईकांना दोन लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे, तर जखमींना उपचारासाठी ५० हजारांची मदत जाहीर करण्यात आली आहे. याबाबतची माहिती पंतप्रधान कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

शुक्रवारी (ता. ३० जून) नागपूरवरून सायंकाळी पाच वाजता पुण्याकडे ही बस निघाली होती. शनिवारी (१ जुलै) रात्री एक वाजून २२ मिनिटांनी विदर्भ ट्रॅव्हल्सच्या धावत्या गाडीचे (Bus MH 29 BE 1819) समोरील टायर अचानक निघाल्याने ट्रॅव्हल्स समृद्धी महामार्गावरील पुलावरील दुभाजकाला धडकून पलटली.

बस उलटल्यानंतर काही मिनिटांतच तिने पेट घेतला. त्यानंतर स्फोट होऊन संपूर्ण बस जळाली. यात २५ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. विदर्भ ट्रॅव्हल्सची ही बस कारंजा येथे जेवणासाठी थांबली होती. त्यानंतर कारंजाजवळ असलेल्या इंटरचेंजवरुन समृद्धी महामार्गावर पुण्याला (Pune) जाण्यासाठी मार्गस्थ झाली होती.

(Edited By : Mangesh Mahale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com