Bulldozer Politics : आंबेडकर म्हणतात, ‘बुलडोझर’ राजकारण संविधानाची पायमल्ली करणारे !

Prakash Ambedkar : मैत्री असतानाही शिंदे सरकारला दिली राजधर्माची शिकवण.
Prakash Ambedkar and Eknath Shinde
Prakash Ambedkar and Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

Akola Politics : अयोध्येत प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापूर्वी रविवारी (ता. 21) आणि नंतर सोमवारी (ता. 22) मीरा भाईंदर महापालिका हद्दीत हिंसक घटना घडल्या. त्या घटनेनंतर त्या भागात अनधिकृत बांधकामांवर मंगळवारी (ता. 24) महापालिकेद्वारे नयानगर भागातील हैदरी चौक परिसरातील अनधिकृत बांधकामांवर जेसीबीच्या साहाय्याने धडक कारवाई करून ते उद्ध्वस्त केले.

वाढीव अनधिकृत बांधकामे, टपऱ्‍या, अनधिकृत शेड जमीनदोस्त करण्यात आले. ही कारवाई करताना दंगल नियंत्रण पथक, राज्य राखीव दलाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या होत्या. नयानगरमध्ये घडलेल्या घटनेनंतर महापालिकेने लगेच ही कारवाई केली. या कारवाईवर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी राज्यातील शिंदे सरकारला राजधर्माची आठवण करून दिली आहे. भाजपसमर्थित शिंदे सरकारची ही कृती संविधानाची पायमल्ली करणारी असल्याचा घणाघाती आरोप प्रकाश आंबेडकर यांनी कला आहे.

Prakash Ambedkar and Eknath Shinde
Akola Politics : अजितदादांच्या राष्ट्रवादीत उफाळून आला पुन्हा गटबाजीचा वाद!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र सरकारने मीरा रोड येथील बुलडोझरद्वारे पाडापाडीचे राजकारण अयोग्य आहे. दडपशाही वाढवण्यासाठी आणि अल्पसंख्याकांमध्ये भीतीचे आणि असहायतेचे वातावरण कायम ठेवण्यासाठी ही बुलडोझर कारवाई डिझाइन केली आहे. जर बांधकामे खरोखरच बेकायदेशीर असतील, तर योग्य प्रक्रियेद्वारे आणि कायद्याचे राज्य आणि न्याय यांचे पालन करून ती कृती करण्याची गरज प्रकाश आंबेडकर यांनी वर्तवली आहे.

मुख्यमंत्री हे राज्याच्या नगरविकास खात्याचेदेखील मंत्री आहेत. आंबेडकरांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना संविधानाची पायमल्ली होत असल्याचे म्हटले आहे. बुलडोझर कारवाईच्या डिझाइनद्वारे केवळ दुकाने आणि घरे उद्ध्वस्त केली जात नाहीत, तर राज्यघटनेचीही ही सरळसरळ पायमल्ली झाल्याचा आरोप आंबेडकर यांनी केला आहे. आंबेडकर यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत मैत्री असताना थेट आंबेडकरांनी मुख्यमंत्र्यांना राजधर्माची आठवण का करून दिली, याविषयी अनेक तर्कवितर्क काढले जात आहे.

रविवारी (ता. 21) रात्री व सोमवारी (ता. 22) सायंकाळी नयानगर भागात हिंसक घटना घडल्या होत्या. काही समाजकंटकांकडून वाहनांची तोडफोड, मारहाण त्याचप्रमाणे दगडफेकीच्या घटना घडल्या होत्या. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: या प्रकरणात लक्ष घातले. त्यानंतर नयानगर भागातील हैदरी चौक परिसरातील अनधिकृत बांधकामांवर जेसीबीच्या साहाय्याने धडक कारवाई करून ते उद्ध्वस्त करण्यात आले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

नयानगरमध्ये घडलेल्या घटनेनंतर महापालिकेने लगेच ही कारवाई केल्यामुळे त्याची समाजमाध्यमांवर जोरदार चर्चा रंगली आहे. याप्रकरणी आतापर्यंत १५ जणांना अटक करण्यात आली आहे. रविवारी रात्री घोषणा दिल्याच्या कारणावरून काही समाजकंटकांनी वाहनांची तोडफोड करून महिलांसह काही जणांना मारहाण केल्याची घटना घडली होती. सोमवारी (ता. 22) सायंकाळीदेखील मिरवणुकीवर दगडफेक करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. त्यात 20 ते 22 जण जखमी झाले आहेत. भाजपनेते नीतेश राणे यांनी रोहिंगे आणि बांगलादेशींचे कृत्य सहन करणार नाही, असा दम दिला होता.

Edited By : Atul Mehere

R...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com