Sameer Kunawar :भूमापकाचा आत्महत्येचा प्रयत्न; भाजप आमदार समीर कुणावरांवर गुन्हा

Sevagram News : आमदारांनी कार्यालयाच्या तक्रारींचा पाढा वाचला.
Sameer kunawar
Sameer kunawar Sarkarnama
Published on
Updated on

Hinganghat News : भूमी अभिलेख कार्यालयातील कर्मचाऱ्याला शिवीगाळ करणारे भाजपचे आमदार समीर कुणावर यांच्याविरोधात दोन पोलिस ठाण्यात तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. आमदार कुणावर यांनी मानसिक त्रास दिल्याने प्रशांत बबनराव येते या भूमापकाने विष पाशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप होत आहे.

प्रशांत येते यांच्यावर सेवाग्राम येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्या पत्नीने आमदारांच्या विरोधात हिंगणघाट व सेवाग्राम पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी आमदारांवर कारवाई न केल्यास पुन्हा आत्महत्या करण्याचा इशारा प्रशांत येते यांनी दिला आहे.

हिंगणघाट येथील तालुका भूमी अभिलेख कार्यालयात हिंगणघाटचे भाजप आमदार समीर कुणावार यांनी उपविभागीय महसूल अधिकारी व तहसीलदारांसोबत सोमवारी भेट दिली. नागरिकांच्या कार्यालयाबाबत येणाऱ्या तक्रारीसंदर्भात ही आकास्मिक भेट असल्याचे सांगितले. तेथूनच आमदारांनी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी फोनवर लाउडस्पीकर चालू करून संवाद केला. यात आमदारांनी कार्यालयाच्या तक्रारींचा पाढा वाचला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दुसऱ्या दिवशीही नागपूरच्या अधिकाऱ्यांसह आमदारांनी पुन्हा कार्यालयात धडक दिली आणि कार्यालयातील कागदाची पडताळणी सुरू झाली. या दरम्यानच आमदारांनी कार्यालयातील परिरक्षण भूमापकाला अश्लील भाषेत शिवीगाळ करून जोड्याने मारत जिवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप होत आहे.

हा प्रकार झाल्यानंतर कार्यालयातील परीक्षण भूमापक असलेले प्रशांत येते यांनी कार्यालयाच्या बस स्थानक परिसरात विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यांच्यावर सध्या सेवाग्राम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यानंतर हिंगणघाट व सेवाग्राम पोलिसांकडे आमदार कुणावारच्या विरुद्ध तक्रार दाखल केली आहे.

Sameer kunawar
Maratha Reservation:'बाजारात चार आणे अन् राजकारणात राणे'; आंदोलकांचे राणेंना प्रत्युत्तर

प्रशांत येते यांनी केलेले आरोप...

कुणावार हे महाराष्ट्रातले एकमेव असे आमदार आहे, जे शासकीय कार्यालयात येऊन शासकीय दप्तर तपासणी करतात. त्यांना दप्तर तपासणी करण्याचा त्यांना कोणताच अधिकार नाही. त्यांना माझ्याविषयी काही तक्रार असल्यास वरिष्ठकडे तक्रार द्यायला पाहिजे होती.

त्यांनी वैयक्तिक रित्या मला टार्गेट करून मला शिवीगाळ केली व मला मानसिक त्रास दिला आहे. कार्यालयातील सगळ्या कनिष्ठ कर्मचाऱ्यांसमोर अपमान केला. यामुळे मला वाईट वाटलं आणि हुकूशाही पद्धतीने कार्यालयात आमदार येतात आणि अधिकाऱ्याच्या खुर्चीवर बसतात.

राजपत्रित अधिकाऱ्यांच्या खुर्ची बसण्याचा अधिकार त्यांना नाही. कुणावर हे हिंगणघाटच्या प्रत्येक कार्यालयात असं जाऊन मानसिक त्रास देतात, असा आरोप प्रशांत येते यांनी केला आहे

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com