Sharvari Tupkar : शर्वरी तुपकरांसह कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल; अटकही होण्याची चिन्हं!

Ravikant Tupkar : रविकांत तुपकरांना अटक झाल्यानंतर केले होते आंदोलन!
Sharvari Tupkar
Sharvari TupkarSarkarnama
Published on
Updated on

Buldhana News : सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आंदोलन उभारणाऱ्या शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या पत्नी शर्वरी तुपकर यांच्यावरही पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहे. रेल्वे रोको आंदोलनाचा इशारा देणारे शेतकरी नेते रविकांत तुपकर यांना बुलढाणा पोलिसांनी आंदोलनापूर्वीच बेकायदेशीर अटक करून रात्रभर पोलिस ठाण्यात डांबले होते.

दरम्यान, तुपकरांच्या पश्च्यात हे आंदोलन पुढे नेणाऱ्या अ‍ॅड. शर्वरी तुपकर यांच्यासह आंदोलक शेतकर्‍यांवर पोलिसांनी मलकापूर शहर पोलिस ठाणे व मेहकर पोलिस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले आहेत. या गुन्ह्यांत लवकरच संबंधित कार्यकर्ते आणि शर्वरी तुपकर यांना अटक केली जाण्याची शक्यता आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Sharvari Tupkar
Raosaheb Danve Watched The Kerala Story: चारशे महिलांसोबत दानवेंनी पाहिला `द केरळा स्टोरी`, सेल्फीही दिल्या..

राज्यातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकर्‍यांच्या शेतमालाला भाव मिळावा, शेतीपिकांच्या नुकसानीची भरपाई मिळावी, तसेच रखडलेला पीकविमा मिळावा, यासाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर हे सरकार दरबारी लढा देत आहेत. सरकारला लक्ष द्यायला वेळ नसल्याचा आरोप करीत, तुपकर यांनी 19 तारखेला मलकापूर रेल्वे स्थानकावर रेल्वे रोको आंदोलनाचा इशारा दिला होता. परंतु, या आंदोलनाच्या पूर्वसंध्येलाच (दि.18) बुलढाणा पोलिसांनी रविकांत तुपकर यांना राजूर घाटातून अटक केली होती.

तुपकरांना मेहकर पोलिस ठाण्यात नेण्यात आले असता, जिल्हाभरातील शेतकरी मेहकर पोलिस ठाण्यासमोर जमा होऊन, राज्य सरकारविरोधात घोषणाबाजी करत होते. तसेच, अ‍ॅड. शर्वरी तुपकरांनीही पोलिसांची भेट घेऊन म्हणणे मांडण्याचा प्रयत्न केला होता. तसेच, ही अटक बेकायदेशीर असल्याचे त्या सांगत होत्या. परंतु, पोलिसांनी त्यांचे ऐकले नाही. पोलिस ठाणे परिसरात झालेल्या या गोंधळप्रकरणी मेहकर पोलिसांनी मात्र शर्वरी तुपकर यांच्यासह जवळपास 19 जणांविरोधात तसेच अज्ञात 30 ते 40 जणांविरोधात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले आहेत.

Sharvari Tupkar
Yogesh Kadam : '...तर यापेक्षा दुसरं मोठं दुर्दैव असू शकतं नाही' ; योगेश कदमांचे उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र!

दुसरीकडे, दिनांक 19 जानेवारी रोजी रविकांत तुपकर(Ravikant Tupkar) हे पोलिसांच्या ताब्यात असल्याने त्यांच्या पश्च्यात शर्वरी तुपकरांनी आंदोलन पुढे नेण्याचे निश्चित करून, मलकापूर रेल्वे स्थानक गाठले. यावेळी शेकडो शेतकरी जिल्हाभरातून रेल्वे स्थानकावर धडकलेले होते. यावेळी पोलिसांनी आक्रमक भूमिका घेतली. आंदोलकांसह शर्वरी तुपकर यांना ताब्यात घेऊन मलकापूर शहर पोलिस ठाण्यात नेण्यात आले, तसेच त्यांना एखाद्या गुन्हेगारासारखी वागणूक देण्यात आल्याचाही कार्यकर्त्यांकडून आरोप करण्यात आला आहे.

दोन ते तीन आंदोलक शेतकर्‍यांना अमानुष मारहाण करण्यात आल्याचेही आरोप झाले आहेत. दरम्यान मलकापूर शहर पोलिसांनी शर्वरी तुपकर यांच्यासह 30 ते 32 आंदोलकांविरोधात मुंबई पोलिस कायदा 135 सह भारतीय दंड विधानाच्या 186, 143 आदी गंभीर स्वरुपाच्या कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत. आता या गुन्ह्यांत शर्वरी तुपकर यांच्यासह जवळपास शंभरेक शेतकर्‍यांना अटक होण्याची शक्यता आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com