SP Transfer : बच्चन सिंग अकोल्याचे, बारगळ अमरावती सीआयडीचे एसपी पण का...?

Reshuffling : नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी पोलिस अधीक्षक श्रेणीतील अधिकाऱ्यांच्या बदल्या
Sandeep Ghuge & Bacchan Sing.
Sandeep Ghuge & Bacchan Sing.Sarkarnama
Published on
Updated on

IPS Posting : राज्यातील काही पोलिस अधीक्षकांच्या (IPS) बदल्यांचे आदेश गृह विभागाकडून सोमवारी (ता. 1) काढण्यात आले. त्यानुसार अकोल्याच्या पोलिस अधीक्षकपदी बच्चन सिंग यांची नेमणूक करण्यात आली आहे. अकोल्याचे पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांना पदनियुक्तीच्या प्रतीक्षेत ठेवण्यात आले आहे.

श्रवण दत्त हे नंदूरबारचे नवे पोलिस अधीक्षक असतील. प्रद्युम्न पाटील यांची नंदूरबार येथुन सीआयडी पुण्याच्या अधीक्षकपदी बदली करण्यात आली आहे. अविनाश बारगळ यांना सीआयडी अमरावतीच्या पोलिस अधीक्षकपदी पाठविण्यात आले आहे. नागपूरच्या पोलिस उपायुक्त चेतना तिडके या अंबाजोगाईच्या नव्या अपर पोलिस अधीक्षक असतील.

Sandeep Ghuge & Bacchan Sing.
Akola : पोलिस महासंचालक विवेक फणसळकर आणि अकोल्याचे नाते...

संदीप घुगे यांनी अकोला पोलिस अधीक्षक पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर काही दिवसातच शहरात मोठी जातीय दंगल झाली होती. यात एकाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर अनेक दिवसांपर्यंत शहरात संचारबंदी लागू करण्यात आली होती. पदभार स्वीकारताच घडलेल्या या घटनेमुळे अकोल्यातील लोकप्रतिनिधींनी पोलिस विभागाला चांगलेच घेरले होते. अर्थात घुगे हे निमित्तमात्र ठरले. त्यांच्या पूर्वी पोलिस अधीक्षक पदावर असलेल्या जी. श्रीधर यांच्या कार्यकाळात पोलिस ठाण्यांमध्ये झालेल्या अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या व त्यांचे असलेले गुन्हेगारांशी संबंध याला कारणीभूत ठरल्याचे आजही सांगण्यात येते. जी. श्रीधर यांची माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या प्रकरणात ईडीनेही चौकशी केली होती.

जी. श्रीधर यांनी केलेल्या पोलिस अधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांमध्ये बऱ्याच त्रुटी आढळल्यानंतर संदीप घुगे यांनी दंगलीनंतर तातडीने काही अधिकाऱ्यांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्या केल्या. अशातच दोन आमदारांनी पुन्हा घुगे यांच्यावर ‘लेटरबॉम्ब’ टाकला. शिवसेना उद्धव ठाकरे गटातील बाळापूरचे आमदार नितीन देशमुख यांनी अवैध धंद्यांवरून जिल्हाधिकारी अजित कुंभार यांना ‘अल्टीमेटम’ दिला. तर मूर्तिजापूरचे भाजप आमदार हरीश पिंपळे यांनी पोलिस निरीक्षकांवर अवैध धंद्यांबाबत आरोप करीत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

नोव्हेंबर 2023 मधील या घडामोडींनंतर नागपूर येथे राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन असल्याने अधिकाऱ्यांच्या बदल्या थांबविण्यात आल्या होत्या. अधिवेशन आटोपताच बदली आदेश निघतील असे संकेत होते. अशातच नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी गृह विभागाने आयपीएस अधिकाऱ्यांचे बदली आदेश काढले आहेत. बदली झालेल्यांपैकी हे यापूर्वीही अमरावती ग्रामीणचे पोलिस अधीक्षक होते. अमरावती शहर पोलिस दलातही ते उपायुक्त होते. पुन्हा एकदा त्यांना अमरावतीमध्येच गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस अधीक्षक म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे.

नागपूर शहर पोलिस दलातून बदली झालेल्या उपायुक्त चेतना तिडके यांना अंबाजोगाईला पाठविण्यात आले आहे. अलीकडच्या काळात नागपूर शहरातील वाहतूक कोंडी मोठी समस्या बनली आहे. उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही हिवाळी अधिवेशन काळात यावर चिंता व्यक्त केली. चेतना तिडके यांच्यापूर्वी वाहतूक विभागात कार्यरत असलेले सारंग आवड आपल्या वातानुकूलित कक्षातून फारच कमी वेळा बाहेर पडले. त्यामुळे उपराजधानी नागपुरातील वाहतूक समस्या बिकट झाली. त्यामुळे अतिरिक्त पोलिस महासंचालकाचा दर्जा असलेले पोलिस आयुक्त अमितेश कुमार हेच नागपुरातील वाहतूक समस्येसाठी सरसावले.

Sandeep Ghuge & Bacchan Sing.
Akola : चार तरुणांचा गस्तीवरील पोलिसांवर गोळीबार; मांजरी-कंचनपुरातील घटना

आवाड यांनी बदली विदर्भातीलच बुलढाणा जिल्ह्यात करण्यात आली. परंतु त्यांना या भागात काम करण्यात फारसे स्वारस्यच नव्हते. लगेचच त्यांनी बदली झाली. आवाड यांच्यानंतर नागपूर शहर वाहतूक विभागात पोलिस उपायुक्त पदावर आलेल्या चेतना तिडके यांनी वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी प्रयत्न केले. परंतु त्यांनाही फारसे यश मिळाले नाही, असे सांगण्यात येते. त्यामुळेच फडणवीस यांनी हिवाळी अधिवेशन काळात वाहतुकीच्या समस्येवर चिंता व्यक्त केली. सोमवारी निघालेल्या बदल्यांच्या यादीत तिडके यांचेही नाव आहे.

Edited by : Prasannaa Jakate

Sandeep Ghuge & Bacchan Sing.
Nagpur : सरकारने नियुक्त्या करताना विचार करावा... असं का म्हणाले वडेट्टीवार?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com