Chandrakant Khaire News: ओवेसींकडे जायला आम्ही लाचार नाही, बावनकुळेंनी सांभाळून बोलावं !

Chandrashekhar Bawankule: भाजप त्यात भांडणं लावण्याचा प्रयत्न करत आहे.
Chandrakant Khaire and Chandrashekhar Bawankule.
Chandrakant Khaire and Chandrashekhar Bawankule.Sarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Politics News : एकतर ओवेसी उद्धव ठाकरेंकडे जातील, नाहीतर ठाकरे ओवेसींकडे जातील, असे वक्तव्य परवा परवा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले होते. त्याचा समाचार माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी काल घेतला. ओवेसी यांना भेटण्यासाठी आम्ही लाचार नाही. एमआयएम ही भाजपची बी टीम आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांभाळून बोलाव, असे ते म्हणाले.

बावनकुळेंनी विनाकारण काही बोलू नये. मुस्लीम समाज आमच्याकडे वळायला लागला आहे. वंचित आमच्याकडे वळत आहे. त्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे. त्यामुळे भाजप त्यात भांडणं लावण्याचा प्रयत्न करत आहे. उपमुख्यमंत्री राजकारण करतात. विरोधकांची कामे केली जात नाहीत, असा आरोप खासदार खैरे यांनी केला.

शिवसेना प्रमुखांच्या आदेशानुसार आम्ही शिवगर्जना यात्रा करत आहोत. मी गडचिरोलीचा दौरा करणार आहे. या यात्रेतून दगाबाजीची माहिती लोकांपर्यंत पोहोचवून गद्दारांचे पितळ उघडे पाडणार आहे, असे ठाकरे गटाचे चंद्रकांत खैरे यांनी सांगितले.

माजी खासदार चंद्रकांत खैरे काल नागपुरात रवि भवनात आयोजित पत्रकारपरिषदेत बोलत होते. ते म्हणाले, गडचिरोलीशी माझा चांगला परिचय आहे. महाराष्ट्रात आज नको तेवढी वाईट परिस्थिती निर्माण झाली आहे. भाजपने राज्यात वेगळी पद्धत सुरू केली आहे. त्यांच्यात आमचे ४० गद्दार सहभागी झाले. ते स्वर्गीय आनंद दिघे यांचे नाव घेतात. मात्र त्यांच्यासोबत मी स्वतः काम केलं आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेना फोडली हे कोणत्याही शिवसैनिकाला आवडले नाही.

गद्दारांनी उद्धव ठाकरे यांच्याशी दगाबाजी केली. आदित्य ठाकरे यांच्याबद्दल काहीही बोलले जाते आहे. एकनाथ शिंदे घटनाबाह्य पद्धतीने मुख्यमंत्री झाले. त्यामुळे आम्ही आता जनतेत जाऊन या गद्दारांची माहिती लोकांमध्ये जाऊन देत आहोत, असेही खैरे म्हणाले. बाळासाहेबांनी कष्टाने शिवसेना उभी केली. ती गद्दारांनी फोडली. उद्धव ठाकरे यांच्या बाजूने सर्वधर्मीय जनता आहे.

Chandrakant Khaire and Chandrashekhar Bawankule.
Chandrakant Khaire News : बीजेपी युज अँड थ्रो पार्टी, ठाकरेंच्या पाठीशी मजबुतीने उभे राहा..

सुप्रीम कोर्टात उद्धव ठाकरे यांचा विजय होऊ दे, अशी प्रार्थना टेकडी गणेशाला करणार आहे. निर्णय आमच्या बाजूने येऊ द्या. मग बघा यांचे काय होते, आता आम्ही थांबणार नाही. आता शिवगर्जना करणार, असे ते म्हणाले. निवडणूक आयोगाने दगा दिला. आयोगाने दबावात निकाल दिला. केंद्र सरकारच्या दबावाखाली शिवसेना चिन्हाचा निर्णय झाला. असे दबावाचे राजकारण मी एवढ्या वर्षात पाहिले नाही, असे खैरे (Chandrakant Kaire) म्हणाले.

गडकरींना बाजूला सारल्याने मराठवाड्याचे नुकसान..

भाजपच्या (BJP) एकाही मंत्र्यांना काम करण्याचा अधिकार नाही. नितीन गडकरी (Nitin Gadkari) काम करायचे. त्यांच्याकडे जिल्ह्याचे एक काम घेऊन गेलो होतो. पाच-सहा महिन्यानंतर परत लोकसभेत कामाबाबत विचारले, त्यावर गडकरी यांनी मी यावर बोलू शकत नाही, असे सांगितले. त्यांच्या बोलण्यावरून त्यांना भाजपमध्ये बाजूला सारले गेले आहे, हे स्पष्ट दिसले. गडकरींना बाजूला सारल्याने आमच्या मराठवाड्याचे नुकसान करण्यात आले, असा दावा खैरे यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com