Congress Leader Attack : चंद्रपूर गोळीबारानं हादरलं! काँग्रेस शहराध्यक्षाच्या निवासस्थानावर हल्ला

Gunmen attacked residence Congress City President Raju Reddy Ghugus Chandrapur : चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्गुस शहरातील काँग्रेसचे शहराध्यक्ष राजू रेड्डी यांच्या निवासस्थानावर हल्लेखोरांनी गोळीबार केल्याची घटना घडली आहे. 
raju reddy
raju reddySarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Congress Leader Attack : चंद्रपूरच्या घुग्गुस शहरातील काँग्रेसचे शहराध्यक्ष राजू रेड्डी यांच्या निवासस्थानी हल्लेखोरांनी गोळीबार केला. यामुळे खळबळ उडाली असून संरक्षणासाठी पोलिसांनी राजू रेड्डी यांच्या घराभोवती बंदोबस्त वाढवला आहे.

हल्लेखोरांचा गोळीबार करण्याचा उद्देश काय होता? आणि हल्लेखोर कोण होते?  याचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे. हल्लेखोरांच्या गोळीबारानंतर घुग्गुस शहरात तणावाचे वातावरण होते. त्यामुळे चंद्रपूर पोलिसांनी घुग्गुस शहरात संवेदनशील भागासह फिक्स पॉईंटवर बंदोबस्त वाढवला होता. राजू रेड्डी यांच्या तक्रारीनुसार रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदवण्याचे काम सुरू होते. 

चंद्रपूरच्या घुग्गुस शहर पोलिसांनी काँग्रेसचे (Congress) राजू रेड्डी यांच्या निवासस्थानी बंदोबस्त वाढवला होता. पोलिसांनी हल्लेखोरांचा तपास सुरू केला आहे. पोलिसांनी प्राथमिक तपासात राजू रेड्डी यांच्या निवासस्थानाच्या वरच्या मजल्यावरील गॅलरीत रिकामे काडतूस आढळले आहे. 

raju reddy
Ahilyanagar crime news : कत्तलसाठी डांबलेल्या गायींना सोडवणाऱ्या गोरक्षकांना दगडाचा जीवघेणा मारा; शिवसेना उपनेत्याविरोधात गुन्हा दाखल

काँग्रेसचे राजू रेड्डी यांच्या निवासस्थानावर भ्याड हल्ल्याची घुग्गुस शहरात वार्ता वाऱ्यासारखी पसरल्यावर त्यांच्या समर्थकांनी निवासस्थानी गर्दी केली होती. राजू रेड्डी यांना पोलिस (Police) संरक्षण वाढवण्यात आले होते.  

raju reddy
Top Ten News : ठाकरेंकडून तिसऱ्याच दिवशी डॅमेज कंट्रोल ; शिवसेना उपनेत्याविरोधात गुन्हा दाखल - वाचा महत्त्वाच्या घडामोडी!

या भ्याड हल्ल्यामागे कट असल्याचा आरोप राजू रेड्डी यांच्या समर्थकांनी केला आहे. राज्यातील शांतता-सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थितीत झाले आहेत. या भ्याड हल्ल्याचा पोलिसांनी कसून शोध घेऊन नेमका काय प्रकार आहे, हे समोर आणावं, अशी मागणी राजू रेड्डी यांच्या समर्थकांनी केली आहे. 

पोलिसांकडून हायअलर्ट

पोलिसांनी घुग्गुस शहरासह चंद्रपूर जिल्ह्यात हायअलर्ट दिला असून, नाक्यांवर बंदोबस्त वाढवला होता. तसेच हल्ल्याच्या अनुषंगाने काही ठिकाणी चौकशी देखील करण्यात येत होती. राजू रेड्डी यांच्या निवासस्थानाशेजारील काही सीसीटीव्हीमधील चित्रीकरण देखील तपासण्यात आले.

अधिवेशनात मुद्दा तापणार

पोलिसांनी या हल्ल्याचा तपासासाठी गोपनीय पातळीवर गुप्तता पाळली जात होती. याबाबत वरिष्ठ पातळीवरील अधिकाऱ्यांमध्ये तपासाबाबत सातत्याने चर्चा होत होती. दरम्यान या हल्ल्याचे पडसाद राजकीय क्षेत्रात उमटू लागले आहेत. विधानसभेच्या अधिवेशनात देखील भ्याड हल्ल्याचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे. 

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com