MLA Kishor Jorgewar News : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाबाबत अनेक तक्रारी प्राप्त होत आहेत. रुग्णालयात औषधसाठा उपलब्ध असतानाही त्यांना बाहेरून औषध विकत आणायला सांगणे, हा अतिशय चुकीचा प्रकार आहे. हे प्रकार तात्काळ थांबवा, अशा शब्दांत आमदार किशोर जोरगेवार यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातीलअधिकाऱ्यांना खडसावले.
आज आमदार किशोर जोरगेवार यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालयाची पाहणी केली. यावेळी जिल्हा सामान्य रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बंडू रामटेके, उपनिवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. चांदेकर, डॉ. तेजस्विनी चौधरी, डॉ. रोहित होरे, डॉ. प्रशांत मगदूम, डॉ. ऋतुजा गनगारडे यांच्यासह महिला शहर संघटिका वंदना हातगावर, युवती तथा वैद्यकीय सेवा प्रमुख भाग्यश्री हांडे, आदिवासी विभागाचे जिल्हाध्यक्ष जितेश कुळमेथे, राशेद हुसेन, विश्वजित शाह, देवा कुंटा, बबलु मेश्राम, रुपा परसराम, दुर्गा वैरागडे आदी त्यांच्या सोबत होते.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय येथे जिल्ह्यासह बाहेर जिल्ह्यांतील रुग्ण उपचाराकरिता येत असतात. त्यामुळे रुग्णांचे समाधान होईल, असे उपचार येथे झाले पाहिजे. रुग्णांशी तथा त्यांच्या नातलगांशी आपली वागणूक योग्य असली पाहिजे. अशा सूचना यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी दिल्या. रुग्णालयातील अनेक वार्डांत पिण्याच्या पाण्याची समस्या आहे. ती तात्काळ दूर करा. आपण येथे १०० पिण्याच्या पाण्याच्या कॅन उपलब्ध करून दिल्या आहेत.
पाण्याची समस्या सोडविण्यासाठी आणखी काही उपाययोजना करायच्या असतील, तर त्या रुग्णालय प्रशासनाने सुचवाव्या, असेही आमदार जोरगेवार यांनी सांगितले. चंद्रपूर (Chandrapur) रुग्णालयातील ब्लड स्टेटींग लॅबच्या बाबतीतही अनेक तक्रारी आहेत. रुग्णांच्या रक्ताचा नमुना प्राप्त झाल्यानंतर त्याचा अहवाल कमीत कमी वेळेत देण्याचा प्रयत्न करा, ब्लड लॅब येथील व्यवस्था सुसज्ज करण्याच्या सुचनाही यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी केल्या. आयसीयुच्या अनेक बेडवर ऑक्सिजन व्यवस्था सुरळीत करण्याच्या सुचनाही यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी दिल्या.
प्रसुतीकक्षात रुग्णांना बाहेरून औषधे आणण्यास सांगितले जात असल्याची तक्रार रुग्णांनी केली. यावर आमदार किशोर जोरगेवार यांनी चांगलाच संताप व्यक्त केला. रुग्णालयात औषधसाठा उपलब्ध असतानाही बाहेरून औषध आणायला लावणे, हा प्रकार गंभीर आहे. यापुढे हे खपवून घेतले जाणार नाही. हे प्रकार बंद करा, अशा शब्दांत त्यांनी अधिकाऱ्यांना सुनावले. येथील डॉक्टरांच्या (Doctors) काही मागण्या रास्त आहेत. त्या सोडविण्याच्या दिशेनेही रुग्णालय प्रशासनाने प्रयत्न करावेत. डॉक्टरांनी संपाचा मार्ग स्वीकारू नये, असेही आमदार किशोर जोरगेवार यांनी सांगितले.
पाणी नसल्याने थांबल्या शस्त्रक्रिया..
रुग्णालयात पाहणीदरम्यान पाणी उपलब्ध नसल्याने मोती बिंदूवरील शस्त्रक्रिया तीन दिवस लांबली असल्याचे आमदार किशोर जोरगेवार (Kishor Jorgewar) यांच्या निदर्शनास आले. यावर त्यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. पाणी नव्हते तर ते रुग्णालय प्रशासनाने आमच्या लक्षात आणून देणे अपेक्षित होते. मात्र रुग्णालयातील समस्या या रुग्णालय प्रशासनाकडून आमच्या पर्यंत कधीच पोहोचत नाही. रुग्णांकडून येथील समस्यांची माहिती आमच्या पर्यंत येते. यापुढे असे चालणार नाही. येथील अडचणी या रुग्णालय प्रशासनाने (Hospital) आमच्या पर्यंत पोचवाव्यात, असे ते म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.