MLA Disqualification Result : चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले कुणाचे अभिनंदन?

Chandrashekhar Bawankule : अयोध्येतील निमंत्रण नाकारल्याने काँग्रेसवर केली तीव्र टीका
Uddhav Thackeray and Chandrashekhar Bawankule
Uddhav Thackeray and Chandrashekhar Bawankule Sarkarnama
Published on
Updated on

Nagpur News : आमदार अपात्रतेच्या मुद्द्यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेला निर्णय योग्य आहे. सर्वांना न्याय दिल्याबद्दल भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी अध्यक्षांचे कौतुक करीत अभिनंदन केले. नागपूर येथे ते प्रसार माध्यमांशी बोलत होते.

अपात्रतचा प्रकरणाचा निकाल लागल्यानंतर सुप्रीम कोर्टात जाण्यापासून कोणीही कोणालाही रोखलेले नाही. उद्धव ठाकरे यांना सुप्रीम कोर्टात जायचे असेल तर त्यांनी जावे, असे ते म्हणाले. अपात्रतेच्या मुद्द्यावर नार्वेकरांनी दिलेला निकाल हा पारदर्शक पद्धतीने दिला आहे. त्यामुळे नार्वेकर यांचे अभिनंदन करावे लागले, असे ते म्हणाले.

Uddhav Thackeray and Chandrashekhar Bawankule
MLA Disqualification Result: सत्तासंघर्षात उद्धव ठाकरेंना 'या' चुका भोवल्या...

उद्धव ठाकरे यांचे खासदार आमदार निघून गेले तेव्हाच त्यांचे पक्षनेतेपद संपले होते. निवडून आलेल्या प्रतिनिधींना एकूण मतदान किती आहे. मतदानाच्या आधारावर पक्ष नोंदणीकृत होत असतो. निवडून आलेले प्रतिनिधी जर सोबत नसतील, तर आपोआपच पक्षाचे नेतेपद जाते. सर्वांत जास्त लोकप्रतिनिधी आणि मतांची संख्या ज्यांच्याकडे असते त्यांनाच पक्ष नेतेपद मिळते. एकनाथ शिंदे हे नेते आहे. सुप्रीम कोर्टानेही निवडणूक उद्धव ठाकरे यांची याचिका फेटाळली आहे, असे ते बावनकुळे यांनी सांगितले.

आमदार अपात्रतेच्या निकालाचा परिणाम महाराष्ट्रातील राजकारणावर पडणार नाही. अनेक लोक यापूर्वीच एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पार्टीच्या संपर्कात आहेत. जे भाजपात येतील त्यांच्यासाठी पक्षाचा दुपट्टा तयार आहे. त्यांना भाजपात पक्षप्रवेश देण्यात येईल. नियम सर्वांसाठी सारखेच आहेत. एकनाथ शिंदे यांना वेगळा नियम आणि उद्धव ठाकरे यांना वेगळा नियम असे होणार नाही. निकाल हा निकाल असतो मेरीटच्या आधारावर आमदार अपात्रतेचा निकाल दिला गेला आहे. सुप्रीम कोर्टाने आणि निवडणूक आयोगाने जे मेरीट दिलेत त्याच आधारावर प्रकरणाचा निकाल लागला आहे, असे त्यांनी सांगितले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

जगातील सर्वांत मोठी दीपावली 22 जानेवारीला साजरी होत आहे. देशाचे आराध्य दैवत श्रीराम आहेत. 527 वर्षांनंतर या मूर्तींची जगातील सर्वांत सुंदर मंदिरात प्राणप्रतिष्ठा होत आहे. अशावेळी काँग्रेसने निमंत्रण नाकारणे म्हणजे रामभक्तांचा आणि देशाचा अपमान आहे. काँग्रेस नेहमीच राम मंदिराच्या विरोधात होती. आजही आहे. कोर्टात प्रतिज्ञापत्र देतानी रामसेतू काल्पनिक असल्याचे सरकारने म्हटले होते. राम मंदिरावर काँग्रेसने टाकलेल्या बहिष्काराचा हिशोब समाज चुकता करेल, असे बावनकुळे यांनी सांगितले.

भाजप राज्यात लोकसभा निवडणुकीची तयारी करीत आहे. तीन महिन्यात आपण 46 लोकसभा मतदार संघात जाऊन आलो. सगळ्या ठिकाणी जनता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठिशी उभी आहे. पुन्हा एकदा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीच होणार आहे. 14 जानेवारीला भाजपचे मेळावे होणार आहेत. बुथस्तरावर हे मेळावे घेण्यात येणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष म्हणाले. महायुतीत जागा वाटपाबाबत चर्चा सुरू आहे. भाजपची केंद्रीय कार्यकारिणी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे यासंदर्भातील निर्णय घेतील. जागा कोणालाही मिळाली तरी संबंधित उमेदवाराला 51 टक्के मतदान मिळविण्यासाठी भाजप आणि दोन्ही पक्ष एकमेकांना मदत करतील. महायुती एकमेकांना ताकद देईल, असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले.

Edited by : Atul Mehere

Uddhav Thackeray and Chandrashekhar Bawankule
Shiv Sena MLA Disqualification : नार्वेकरांच्या निकालानंतर ठाण्यात आता फक्त बॅनर बोलणार

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com