Chandrashekhar Bawankule News : भाजपच्या संकल्प यात्रेत महिलेने बावनकुळेंना सुनावलं; 'सिलिंडर दर वाढले, माती खायची का?'

Chandrashekhar Bawankule News : पंतप्रधान म्हणून मोदीजी पाहिजे का? इथे महागाई वाढली आहे..
Chandrashekhar Bawankule News
Chandrashekhar Bawankule NewsSarkarnama
Published on
Updated on

Chandrashekhar Bawankule News : वर्धा येथे आयोजित भाजपच्या संकल्प यात्रेत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना एका महिलेने महागाईच्या मुद्द्यावरून जोरदार सुनावले आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांची भाजप पक्षाच्या वतीने वर्धा संकल्प यात्रा सुरू आहे. या यात्रेच्या निमित्ताने बावनकुळे नागरिकांशी संवाद साधत आहेत. या यात्रेदरम्यान एका महिलेने महागाईवरून बावनकुळे यांना चांगलेच सुनावले आहे. 'वीजदर वाढले आहे, गॅस सिलिंडर महाग झाले आहे, मात्र हे आम्हाला विचारतात की पंतप्रधान मोदी हवेत का? लोकांच्या कामाची गोष्ट करा,' असे म्हणत या महिलेने बावनकुळेंवर प्रश्नांची सरबत्ती केली. (Latest Marathi News)

Chandrashekhar Bawankule News
Thackeray Review Meeting: वर्धा, रामटेक, यवतमाळ-वाशिम लोकसभेसाठी ठाकरे आखणार रणनीती ? गुरुवारी बोलावली आढावा बैठक

बावनकुळे यांच्याशी झालेल्या वादावादीत या महिलेने म्हटले आहे की, "महागाई वाढवून ठेवली आहे. सिलिंडरचे भाव वाढवून ठेवले आहेत. गरीब लोकांना लुटणंच चालू आहे. सिलिंडरचे भाव कमी झाले पाहिजेत. विजेचे बिल वाढलेले आहे. एक लाइट आणि पंखा आहे आमच्या घरी, तरी सहाशे आणि सातशे रुपये वीजबिल येतं आहे. दोन दिवस जर बिल भरायला उशीर झाला तर वीज कापतात. आम्हाला काम नाही, पैसे जवळ नाहीत. माती खायची का आम्ही? असा संताप या महिलेने व्यक्त केला आहे.

Chandrashekhar Bawankule News
Satara BJP News : २०२४ ला तिसऱ्यांदा मोदीच पंतप्रधान होणार; साताऱ्याचा खासदार देशात सर्वाधिक मतांनी निवडून येणार : चंद्रशेखर बावनकुळे

"तुम्हाला पंतप्रधान कोण पाहिजे? पंतप्रधान म्हणून मोदीजी पाहिजे का? असं त्यांनी मला विचारलं, इथे महागाई वाढली आहे, सिलिंडरचे दर वाढले आहेत, मग खायचं काय आम्ही? असं मी कार्यक्रमात बोलत असताना कार्यक्रमात माझा माईक त्यांनी खाली घेतला. मला बोलू दिले नाही," असाही या महिलेने आरोप केला आहे.

(Edited By - Chetan Zadpe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com