Chandrashekhar Bawankule News : ‘हे’ उद्धव ठाकरेंना मान्य आहे का? त्यांनी लंडनमधून व्हिडिओ पाठवावा !

Sawarkar : अभ्यासक्रमात बदल केला आणि सावरकरांचे इतिहासातील धडे वगळले.
Chandrashekhar Bawankule
Chandrashekhar BawankuleSarkarnama
Published on
Updated on

Chandrashekhar Bawankule criticizes Uddhav Thackeray : ते फक्त स्वप्न बघत आहेत. केंद्रात काँग्रेस सत्तेत येणारच नाही. ज्या पद्धतीने हिंदू संस्कृती पुसण्याचं काम कॉंग्रेसचे नेते करीत आहेत आणि धर्मांतर विरोधी कायदा रद्द करणार आहेत, हे उद्धव ठाकरे यांना मान्य आहे का? सध्या ते येथे नाहीत. पण लंडनमध्ये किंवा जेथे कुठे ते असतील, तेथून आजच व्हिडिओ रेकॉर्ड करून सांगावं, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. (Voting for Congress means how much chaos can happen in this country)

आज (ता. १६) नागपूर विमानतळावर ते पत्रकारांशी बोलत होते. कर्नाटकमध्ये कॉंग्रेसची सत्ता आहे. तेथे त्यांनी अभ्यासक्रमात बदल केला आणि सावरकरांचे इतिहासातील धडे वगळले. कॉंग्रेसला मत देणे म्हणजे या देशात किती अराजकता होऊ शकते, हे देशातील जनतेने समजून घेतले पाहिजे. भारत जोडो यात्रेत राहुल गांधींनी वारंवार सावरकरांचा अपमान केला आणि आता कर्नाटक सरकारला आदेश देऊन धर्मांतर विरोधी कायदाही त्यांनी रद्द केला.

पुढच्या काळात गोहत्या बंदी कायदाही रद्द करून गायीची कत्तल करण्यासही परवानगी देण्यात येणार आहे. आता उद्धव ठाकरे यांनी लंडनमधून किंवा महाराष्ट्रात आल्यावर कर्नाटक सरकारने घेतलेला निर्णय मान्य आहे का आणि अजूनही शरद पवार आणि काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसणार आहेत का, याबाबत महाराष्ट्रातील जनतेसमोर आपली भूमिका स्पष्ट करावी, असे आवाहन आमदार बावनकुळेंनी उद्धव ठाकरे यांना केला आहे.

विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी अजित पवारांची आहे. त्यामुळे त्यांना काही ना काही विरोधात बोलावेच लागते. सत्तेपासून पैसा आणि पैशातून सत्ता हा त्यांचा इतिहास आहे. त्यामुळे त्यांनी या सरकारवर जे आरोप केले त्याचे उत्तर त्यांना योग्य वेळी मिळेल.

माजी आमदार डॉ. आशिष देशमुख यांनी ओबीसी विरोधी असलेल्या राहुल गांधीवर टीका केल्याने नाना पटोले यांनी त्यांना पक्षातून काढून टाकलं. काँग्रेसमध्ये ओबीसींची बाजू मांडणे चुकीचे असेलही. पण भाजपमध्ये ओबीसींचा सन्मान आहे.

Chandrashekhar Bawankule
Chandrakant Bawankule'ची कार्यकर्त्यांना ताकीद ! | Shivsena | BJP| Maharashtra Elections|Sarkarnama

आशिष देशमुख (Ashish Deshmukh) यांनी आम्हाला स्पष्ट सांगितले की मला कोणतीही लोकसभा, विधानसभा निवडणूक (Election) लढायची नाही. मला कोणतेही आश्वासन नको आहे. तर मला भाजपमध्ये संघटनात्मक काम करायचे आहे. काँग्रेस ओबीसी विरोधी असल्याने मला आता त्यांच्यासोबत राहायचे नाही.

तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या बीआरएस पक्षाचे काल नागपुरात उद्घाटन झाले. याबाबत विचारले असता, तेलंगणा मॉडेलमध्ये खूप चुका आहेत. ते काय करत आहे आणि मांडत काय आहेत, याची रिल आम्ही लवकरच देणार, असे बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) म्हणाले.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com