Chandrashekhar Bawankule on Pankaja Munde's Statement : मोदींच्या ९ वर्षाच्या कार्यकाळातील संपूर्ण योजनांचे एकत्रीकरण करून एक जनसंपर्क अभियान घर चलो अभियान सुरू केले आहे. मोदींच्या काळातील गरीब कल्याणाच्या योजना, भारताला जगातील सर्वोत्तम देश बनवण्यासाठी त्यांनी केलेले कार्य यांमुळे भारत आज जगात पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असलेला बनलेला आहे, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. (India is now the fifth largest economy in the world)
आज (ता. १) नागपुरात पत्रकारांशी बोलताना बावनकुळे म्हणाले, जगातील १५० देशांनी मोदींचे नेतृत्व मान्य केले आहे. या सर्व बाबी घेऊन आम्ही महाराष्ट्रातील तीन कोटी घरांपर्यंत जाणार आहोत. हे मोठं जनसंपर्क अभियान असणार आहे. केंद्रातील ५० पेक्षा अधिक नेते महाराष्ट्रात येणार आहेत. ४८ लोकसभा मतदारसंघांत आमच्या जनसभा होणार आहेत. २८८ विधानसभा मतदारसंघांमध्ये बूथ प्रमुखांची रॅली होणार आहे.
३० मे ते ३० जून हे अभियान होणार आहे. आमचे आमदार, खासदार त्या-त्या जिल्ह्यांत माहिती देणार आहेत. २०१४ आणि २०१९ मध्ये मोदींनी दिलेले जाहीरनामे पूर्ण केले आहेत. दरवर्षी आमचे सरकार आपला कार्यकाळ जनतेसमोर मांडतात. याही वर्षी सरकारने नऊ वर्षाच्या कार्यकाळाची माहिती जनतेसमोर ठेवली असल्याचे बावनकुळे म्हणाले.
भाजप महासागर आहे. यामध्ये कितीही लहान, मोठे नेते आले. तरीही त्यांच्यासाठी पक्षात जागा आहे. काम करण्यासाठी आमच्याकडे मोठ्या संधी आहेत. ३५ प्रकोष्ट आहेत, ते वेगवेगळ्या स्तरांवर काम करतात. नऊ मोर्चे आहेत. २८८ विधानसभा आम्हाला लढायच्या आहेत. आमच्या पक्षात बाहेरून कुणीही नेते आले, तरी त्यांना त्यांच्या क्षमतेप्रमाणे संधी देण्याची व्यवस्था आमच्याकडे आहे.
मी भाजपचीच (BJP) आहे, पण भाजप कुठं माझा पक्ष आहे, असं भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) काल (ता. ३१ मे) दिल्ली (Delhi) येथे रासपच्या एका कार्यक्रमात बोलल्या. याबद्दल विचारले असता, त्यांच्या बोलण्याचा विपर्यास केला गेला आहे. मी त्यांचं पूर्ण भाषण ऐकलं. त्यामध्ये असं काहीही नाही, असे आमदार चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) म्हणाले.
Edited By : Atul Mehere
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.