Chandrashekhar Bawankule News : शरद पवार डबल गेम करतात, यात त्याचा हातखंडा आहे !

Sharad Pawar : त्यांच्या आयुष्यातील अशा अनेक घडामोडींचे दाखले देता येतील.
Chandrashekhar Bawankule and Sharad Pawar
Chandrashekhar Bawankule and Sharad PawarSarkarnama
Published on
Updated on

Both Eknath Shinde and Devendra Fadnavis are big hearted leaders : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोघेही मोठ्या मनाचे नेते आहेत. कुणी काही जाहिरात दिली आणि ती चुकली तरी लहान-मोठ्या जाहिरातींवरून त्यांचे संबंध खराब होतील, असे अजिबात नाही. ते विचारांनी प्रगल्भ आहे आणि योग्य पद्धतीने सरकार चालवत आहेत, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. (No way that their relationship will be damaged)

आज (ता. २९) दुपारी नागपुरात आले असता विमानतळावर बावनकुळे पत्रकारांशी बोलत होते. शरद पवार यांनी डबल गेम केला असा आरोप भाजपकडून केला जात आहे, याबद्दल विचारले असता, शरद पवारांबद्दल संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे की, ते कधीही डबल गेम खेळतात. त्यांच्या आयुष्यातील अशा अनेक घडामोडींचे दाखले देता येतील. शरद पवार यांचे बोलणे वेगळे आणि करणे वेगळे असते, यात त्यांचा हातखंडा आहे, असे आमदार बावनकुळे म्हणाले.

शरद पवारांनी त्यांच्या जीवनात अनेक सरकार बसवले आणि पाडले. ते बोलतात एक आणि करतात दुसरेच. हे सर्वांनी पाहिले आहे. त्यांचे राजकारण म्हणजे नेहमीच बोलणे एक आणि करणे वेगळेच असाच राहिला आहे. ज्या मंत्र्यांची कामगिरी सुमार आहे, अशांना देवेंद्र फडणवीसांनी मंत्र्यांना काही सूचना दिल्या आहेत, ते सरकारची कामगिरी अधिक चांगली व्हावी, यासाठी आहेत.

राज्य सरकार उत्तम पद्धतीने काम करत आहे आणि अधिक चांगल्या पद्धतीने कामे व्हावे, ही भावना त्यामागे आहे. सरकारची कामं जनतेसाठी व्हावी, ही इच्छा असते आणि त्याच इच्छेने फडणवीसांनी मंत्र्यांना सूचना केली. आम्ही राजकीय कार्यकर्ते आहोत. त्यामुळे आमचे सरकार असताना समाजातील सर्व घटकांसोबत न्याय व्हावा, अशी त्यामागची भावना आहे, असे बावनकुळे म्हणाले.

Chandrashekhar Bawankule and Sharad Pawar
Chandrashekhar Bawankule यांना विश्वास, BJPला मिळणार इतक्या जागा |NDA | UPA | Loksabha Election 2024

सोलापूरमध्ये 'लव्ह पाकिस्तान' असे लिहिलेले फुगे सोलापुरात झळकले आहेत, याबाबत विचारले असता. अशा घटनांसंबंधात काही राजकीय नेत्यांकडून सातत्याने वक्तव्य केले जात आहेत. कधी ओवेसी, कधी शरद पवार तर कधी बंटी पाटील हे नेते ते करतात. असे कृत्य करणाऱ्यांना राजकीय पाठबळ मिळालं नाही, तर त्यांची हिंमत होणार नाही.

काहीच दिवसांपूर्वी शरद पवारांनी (Sharad Pawar) म्हटलं की, ख्रिश्‍चन आणि मुस्लीम समाजाची चिंता वाटते. त्याचा आधार घेऊन काही लोकांनी मग असे कृत्य केले. ओवेसी, शरद पवार आणि बंटी पाटील यांनी असे वक्तव्य करून त्यांना प्रोत्साहन दिले आहे.

सर्वच पक्षांनी हे पाळावे की, भारतात राहून पाकिस्तानचे गुणगान करणाऱ्या शक्तींना उद्ध्वस्त केलं पाहिजे. शिंदे-फडणवीस (Devendra Fadanvis) सरकार अशा शक्तींना शोधून काढेल आणि जमिनीत गाडल्याशिवाय राहणार नाही, असे आमदार चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) म्हणाले.

Edited By : Atul Mehere

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com