Bawankule on Bacchu Kadu : आम्हाला शेवटी तरी जेवण मिळणार का? बच्चू कडूंच्या प्रश्‍नावर बावनकुळे म्हणाले…

NCP : राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या लोकांना घ्यायची काय गरज होती?
Chandrashekhar Bawankule and Bacchu Kadu
Chandrashekhar Bawankule and Bacchu KaduSarkarnama
Published on
Updated on

Chandrashekhar Bawankule on Displeasure of Bachu Kadu : अजित पवार बंड करून शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले. यामुळे शिंदे गटातील आमदार मात्र चांगलेच नाराज झालेले आहेत. आम्ही सोबत असताना राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या लोकांना घ्यायची काय गरज होती, असे म्हणत संजय शिरसाट यांनी, तर शेवटी आलेल्यांना पहिल्यांदा जेवण मिळाले, असे म्हणत बच्चू कडू यांनी नाराजी व्यक्त केली. (The last ones got the food first)

यावेळी पहिल्यांदा येऊनही आम्ही मंत्रिपदासाठी प्रतीक्षेत आहोत. तर मागून आलेले शपथ घेऊन मोकळे झाले, असे म्हणत बच्चू कडू यांनी नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, ‘आता शेवटी आलेल्यांना पहिल्यांदा जेवण मिळाले, तर पहिल्यांदा आलेल्यांना शेवटी तरी जेवण मिळणार का? आता नाराज होऊन तरी काय करणार? सरकारचे संख्याबळ वाढते हे मान्य, पण हा निर्णय घेताना आम्हाला विचारात घ्यायला हवे होते. आता अजित पवार आमच्या निर्णयात आडवे येणार. त्यामुळे आम्ही भाजपला साथ दिली ही आमची चूक झाली का, असा विचार मनात येत आहे.’

बच्चू कडूंच्या प्रश्‍नावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी उत्तर दिले आहे. आज कोराडी येथील निवासस्थानी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, काही नाराजी नसते, अशी घडामोड झाली की कुणालाही थोडं वाईट वाटणं स्वाभाविक आहे.

आधी ते मंत्री होते, आता नाहीत. त्यांची भूमिका योग्य आहे आणि महायुतीमध्ये त्यांचे स्थान महत्वाचे आहे, मोठे आहे. त्यांच्या म्हणण्यावर अनेक निर्णय सरकारमध्ये झाले आहेत. विकलांग मंत्रालय त्यांच्याच मागणीवरून करण्यात आले आहे.

Chandrashekhar Bawankule and Bacchu Kadu
Bawankule On Sharad Pawar: परिवारातले लोक सोडून जात आहेत, आता शरद पवारांनी आपलं घर सांभाळावं !

महाविकास आघाडीमध्ये (Mahavikas Aghadi) जो मान त्यांना नव्हता, तो शिंदे-फडणवीस यांच्या सरकारमध्ये मिळाला. भविष्यात कोणती ना कोणती मोठी जबाबदारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) बच्चू कडूंना देतील, असा विश्‍वास आमदार बावनकुळेंनी व्यक्त केला.

बच्चू कडूंना काळजी करण्याचे काहीही कारण नाही. काळजी करण्याची गरज उद्धव ठाकरेंना आहे. कारण त्यांची शिल्लक सेना आता किंचित झाली आहे आणि किंचितची शून्याकडे चालली आहे, असा टोला आमदार चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) उद्धव ठाकरेंना हाणला.

Edited By : Atul Mehere

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com