अकोल्यात बालमित्र आमने-सामने, भाजपने टाळले; शिवसेनेचे शक्ती प्रदर्शन...

आमदार बाजोरिया MLA Bajoriya यांच्या विरोधात भाजपचे वसंत खंडेलवाल BJP's Vasant Khandelwal यांची उमेदवारी जाहीर झाल्याने या मतदारसंघातील चुरस वाढली आहे.
Gopikishan Bajoriya and others at Collector Office.
Gopikishan Bajoriya and others at Collector Office.Sarkarnama
Published on
Updated on

अकोला : अकोला-बुलडाणा-वाशीम स्थानिक प्राधिकारी मतदारसंघासाठी महाविकास आघाडीतर्फे विद्यमान आमदार गोपीकिशन बाजोरिया यांची शिवसेनेतर्फे उमेदवारी कायम ठेवली. सन २०१५ मध्ये शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांनी एकत्र निवडणूक लढविली होती. यावेळी मात्र हे दोन्ही मित्रपक्ष एकमेकांच्या विरोधात विधान परिषदेची निवडणूक लढवीत आहे. विशेष म्हणजे, एकेकाळचे मित्र पक्षांनी यावेळी उमेदवारीही दोन बालमित्रांनाच दिली आहे. विद्यमान आमदार बाजोरिया यांच्या विरोधात भाजपचे वसंत खंडेलवाल यांची उमेदवारी जाहीर झाल्याने या मतदारसंघातील चुरस वाढली आहे.

विधान परिषदेच्या अकोला, बुलडाणा, वाशीम स्थानिक प्राधिकारी मतदारसंघासाठी महाविकास आघाडीतर्फे शिवसेनेचे विद्यमान आमदार गोपीकिशन बाजोरिया यांनी महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांच्या नेत्यांसोबत शक्ती प्रदर्शन करीत सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात मोजक्या पदाधिकाऱ्यांसोबत पोहोचत भाजपचे वसंत खंडेलवाल यांनी उमेदवार अर्ज दाखल करताना शक्ती प्रदर्शन टाळले.

त्याचा प्रत्यय शिवसेनेतर्फे उमेदवारी अर्ज दाखल करताना आमदार बाजोरिया यांनी केलेल्या शक्ती प्रदर्शनातून आला. सोमवारी आमदार बाजोरिया यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी खासदार अरविंद सावंत खास मुंबईहून आले होते. अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, त्यांच्यासोबत बुलडाण्याचे खासदार प्रतापराव जाधव, शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेतील आमदार अमोल मिटकरी, आमदार विप्लव बाजोरिया, बुलडाणा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार राहुल बोंद्रे, राष्ट्रवादी काँग्रेसचे महानगराध्यक्ष विजय अग्रवाल, मनपा विरोधी पक्ष नेते साजिद खान पठाण, प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष ॲड. सुधाकर खुमकर, युवा सेनेचे विठ्ठल सरप, शिवसेनेचे पदाधिकारी, काँग्रेसचे नगरसेवक व कार्यकर्ते उपस्थित होते.

भाजपने जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल केला तेव्हा वसंत खंडेलवाल यांच्यासोबत मोजके पदाधिकारी होते. शक्ती प्रदर्शन टाळून आमदार डॉ. संजय कुटे यांच्यासह आमदार रणधीर सावरकर, महापौर अर्चना मसने, जयंत मसने, माजी आमदार चैनसुख संचेती या मोजक्याच पदाधिकाऱ्यांच्या उपस्थित अर्ज दाखल केला.

Gopikishan Bajoriya and others at Collector Office.
वऱ्हाडात बुलडाणा जिल्हा ठरणार निर्णायक; अंतिम यादीकडे इच्छुकांचे लक्ष...

जमावबंदीचा विसर..

जिल्ह्यात कलम १४४ नुसार जमावबंदी आदेश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी लागू केला आहे. विधान परिषदेच्या उमेदवारांना उमेदवारी अर्ज दाखल करताना मोजक्या लोकांना सोबत नेण्याची परवानगी होती. महाविकास आघाडीतर्फे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आलेल्या आमदार गोपीकिशन बाजोरिया यांच्यासोबत शेकडोंच्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले होते. जिल्ह्यात सुरू असलेल्या जमावबंदीचा आदेश झुगारून जिल्हाधिकारी कार्यालयात गर्दी झाल्याने पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली.

आमदारांचा पोलिसांसोबत वाद..

उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात मोजक्या लोकांसोबत उमेदवारांना जाण्याची परवानगी देण्यात आली होती. मात्र, आमदार बाजोरिया यांच्यासोबत असलेले महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे पदाधिकारी, आमदार व कार्यकर्ते मोठ्या संख्येने पोहोचल्याने पोलिसांनी उमेदवारासोबत जाणाऱ्यांना थांबवून धरले. त्यात राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी व बुलडाण्याचे माजी आमदार राहुल बोंद्रे यांचाही समावेश होता. त्यामुळे शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख यांनी बाहेर येत पोलिसांना जाब विचारला. त्यातून शाब्दिक वाद वाढत गेला. अखेर पोलिसांनी परिस्थिती हाताळत वाद मिटविला व दोन्ही पदाधिकाऱ्यांना आत सोडले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com