Gondia Administration : नियोजन ढासळले, शिधा न मिळाल्यानं २३ गावांतील आनंदावर विरजण

Diwali : शिधापत्रिकाधारकांना दिवाळीनंतरही मिळाले नाही धान्य
Anandacha Shidha
Anandacha Shidha Google
Published on
Updated on

Discontent Among Citizens : दिवाळीनिमित्त शासनाच्या वतीनं राज्यातील नागरिकांना ‘आनंदाचा शिधा’ वितरण करण्यात आला. एकीकडे नागपूर जिल्हा प्रशासनानं योग्य नियोजन करीत लोकांच्या घरांपर्यंत हा शिधा पोहोचविला, तर दुसरीकडं गोंदिया जिल्ह्यात मात्र नियोजनाअभावी या योजनेतून २३ गावं वंचित राहिली आहेत. १०० रुपयांत ‘आनंदाचा शिधा’ नागरिकांना मिळणार होता. यात साखर, तेल, पोहे, रवा, मैदा, चनाडाळ दिले जात आहे. मात्र, गोंदियात शिधा पुरवठा करणाऱ्या कंत्राटदाराच्या ढिसाळपणामुळं लाभार्थी वंचित राहिले आहेत.

गोंदिया तालुक्यातील खातीयासह २३ गावांतील शिधापत्रिकाधारकांना ‘आनंदाचा शिधा’ अद्यापही मिळालेला नाही. त्यामुळे या गावांतील नागरिकांची दिवाळी फिक्की झाली आहे. विशेष म्हणजे आनंदाच्या शिधा वाटपाकडं जिल्ह्यातील एकाही नेत्यानं लक्ष दिलेले नाही. (Citizens from Gondia Did Not Received Ration on Occasion of Diwali Allotted by Maharashtra Government)

अनेक स्वस्त धान्य दुकानांमध्ये धान्याचा तुटवडा जाणवला. कुठे पोहे कमी पडले तर कुठे चनाडाळ. अशातच इंटरनेट बंद असल्यानं लाभार्थ्यांना अनेक तास ताटकळत बसावे लागले. इंटरनेट सुविधा अनेक ठिकाणी सुरूच न झाल्यानं शिधा वाटपही दुकानदारांना करता आलं नाही. मात्र, एकाही प्रशासकीय अधिकारी किंवा नेत्याचं या विषयाकडं लक्ष नव्हतं. अधिकारी व नेते आपलीच दिवाळी आनंदाची करण्यात गुंग होते.

‘आनंदाचा शिधा’ उपलब्ध करून देण्याचा निर्णय राज्य शासनानं घेतल्यानंतर त्यांचं नियोजन महिनाभरापूर्वीच करण्यात आलं होतं. दिवाळीपूर्वी काही स्वस्त धान्य दुकानांना शिधा पोहोचविण्यात आला होता. मात्र, काही ठिकाणी अद्यापही आनंदाचा शिधा पोहोचलाच नाही. त्यामुळं शिधापत्रिकाधारकांना निराशेचा सामना करावा लागला. तब्बल २३ गावांपर्यंत शिधा न पोहोचल्यानं अधिकाऱ्यांनी कशा पद्धतीनं नियोजन केलं होतं. यावर प्रश्न निर्माण होतोय. विशेष म्हणजे ही गावं जिल्हा मुख्यालायाच्या ठिकाणी असलेल्या गोंदिया तालुक्यातीलच आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

गोंदिया तालुक्याचे पुरवठा निरीक्षक एच. डी. नाईक यांनी सांगितलं, की कुठे मैदा तर कुठे पोहे कमी पडले. आनंदाचा शिधा किटमध्ये काही ठिकाणी काही वस्तू मिळालेल्या नाहीत. किटचा पुरवठा करणाऱ्या कंत्राटदारांना पुरवठा विभागानं कळविलं होतं. पण, त्यानंतरही त्यांनी पुरवठा केला नाही. त्यामुळं ही समस्या निर्माण झाली. नागरिकांची ही गैरसोय होत असताना ना सत्ताधारी नेते पुढे सरसावले ना विरोधी पक्षातील नेत्यांनी प्रशासनाला जाब विचारला. त्यामुळं या राजकीय उदासीनतेचा फटका सामान्यांना सहन करावा लागला.

Edited by : Prasannaa Jakate

Anandacha Shidha
Gondia NHM Protest : आत्रामांच्या गोंदियात एनएचएम कर्मचारी आंदोलनात व्यस्त, सेवेअभावी रुग्ण झाले त्रस्त

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com