Munantiwar : मुख्यमंत्री शिंदेंचा एस आणि फडणवीसांचा एफ; अशी ही सुपरफास्ट एक्सप्रेस आहे...

Budget session : भविष्यात एक अर्थसंकल्पीय अधिवेशन नागपूरला घ्यावे, या विषयावर आज चर्चा झाली.
Eknath Shinde, Sudhir Mungantiwar and Devendra Fadanvis.
Eknath Shinde, Sudhir Mungantiwar and Devendra Fadanvis.Sarkarnama

Sudhir Mungantiwar News : मागच्या दोन वर्षांत तर अधिवेशनच झालं नाही. त्यापूर्वी २०१९ मध्ये झालं ते फक्त एक आठवडा. भविष्यात एक अर्थसंकल्पीय अधिवेशन नागपूरला घ्यावे, या विषयावर आज चर्चा झाली. त्यामुळे विदर्भ - मराठवाड्याच्या जनतेला न्याय देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असे राज्याचे वने व सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

यासंदर्भात बोलताना मंत्री मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) म्हणाले, केवळ शब्दांनी नव्हे तर कृतीनेही आम्ही विदर्भ - मराठवाड्यासाठी कटिबद्ध आहोत. धानाचा बोनस, माजी मालगुजारी तलावांचा विषय असेल किंवा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी सुचवल्याप्रमाणे दांडेकर समितीमध्ये उद्योगांच्या अनुशेषाचा विषय नव्हता. आता उद्योगांच्या अनुशेषावर विशेष समिती बसवून काम करण्यात येणार आहेत. कारण आता उद्योग केवळ काही क्षेत्रांपुरते मर्यादित झालेले आहेत. विदर्भ, (Vidarbha) मराठवाडा, (Marathwada) कोकण, उत्तर महाराष्ट्र आणि पश्‍चिम महाराष्ट्रातील मागास भागाच्या विकासासाठी हे सरकार कटिबद्ध आहे.

मुख्यमंत्री शिंदेंचा एस आणि फडणवीसांचा एफ असे मिळून एस फॉर सुपर आणि एफ फॉर फास्ट विकास कामे करण्यासाठी हे सरकार बांधील आहे. त्यामुळे आता महाराष्ट्राच्या कोणत्याही विभागातील जनतेला काळजी करण्याचे काही एक कारण नाही. महाराष्ट्राची ही सुपर फास्ट एक्सप्रेस आता सुसाट धावणार आहे. परवा परवा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विदर्भ - मराठवाड्याच्या विकासासाठी ७५ हजार कोटी रुपयांच्या कामांचे लोकार्पण आणि भूमिपूजन केले. ही या सुपरफास्ट सरकारच्या कामाची पहिली झलक आहे. त्यामुळे आगामी काळात विदर्भ - मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्रात खऱ्या अर्थाने विकासाची गंगा अवतरणार आणि वाहणार, असे मंत्री मुनगंटीवार यांनी सांगितले.

Eknath Shinde, Sudhir Mungantiwar and Devendra Fadanvis.
Mungantiwar : वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या कार्याची पुन्हा जागतिक स्तरावर दखल...

यापूर्वीच्या सरकारने काय केले, काय नाही केले, याच्या खोलात जाऊन वेळ अजिबात दवडणार नाही. तर उपलब्ध वेळेत जास्तीत जास्त आणि चांगल्यात चांगली दर्जेदार विकास कामे कशी करता येतील, याकडे आमच्या सरकारचा कटाक्ष असणार आहे. गावखेड्यांना समृद्ध करण्यासाठी जलयुक्त शिवार - २ हा उपक्रम सुरू केला जाणार आहे. यामध्ये गावातले पाणी गावातून वाहून बाहेर जाऊ दिले जाणार नाही, तर गावाच्या शिवारातच अडवून ते जिरवले जाणार आहे. यापूर्वी हा प्रयोग यशस्वी करून दाखविला आहे. यापुढेही तो आम्ही करणार, असेही मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com