Congres MLA Raju Parwe : काँग्रेसला विदर्भात धक्का! आमदार राजू पारवेंचा राजीनामा; शिंदे गटात प्रवेश..

Lok Sabha Election 2024 : "रामटेकमधील कृपाल तुमाने यांच्याबद्दल अहवाल चांगला नाही. तर पर्यायी उमेदवार शोधा.."
Congres MLA Raju Parwe
Congres MLA Raju ParweSarkarnama
Published on
Updated on

Ramtek Political News : काँग्रेसचे विद्यमान आमदार राजू पारवे यांनी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा पक्षाकडे पाठवला आहे. पारवे आजच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता आहे. त्यांना शिंदे गटाकडून लोकसभेची उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. यामुळे काँग्रेसचा एक आमदार फुटला असून, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसला हा मोठा धक्का आहे. (Latest Marathi News)

Congres MLA Raju Parwe
Pruthviraj Chavan On BJP : 'आमचे 'हात' बांधून कबड्डी खेळायला सांगत आहेत', चव्हाण भाजपवर संतापले!

राजू पारवे आता शिंदे गटाकडून रामटेक लोकसभा मतदारसंघातून लोकसभेचे उमेदवार असतील. मागील अनेक दिवसांपासून रामटेकच्या या जागेवरुन महायुतीचा पेच सुटत नव्हता. शिंदे गटानेदेखील रामटेकवर दावा केला होता. रामटेकमधील विद्यमान खासदार कृपाल तुमाने यांच्याबद्दल अहवाल चांगला नाही. पर्यायी उमेदवार शोधा, असे भाजपने शिंदेंना कळवले होते. त्यानुसार आता शिंदेंचा उमेदवार शोध संपला आहे. पारवे हेच आता शिंदेंकडून रामटेकमधून उमेदवार असण्याची दाट शक्यता आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Congres MLA Raju Parwe
NCP Manifesto Committee : लोकसभेसाठी राष्ट्रवादीची जाहीरनामा समिती जाहीर; वळसे पाटलांकडे अध्यक्षपदाची धुरा

आज वर्षा या शासकीय निवास्थानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, (Eknath Shinde) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार , खासदार कृपाल तुमाने आणि आमदार आशिष जैस्वाल या सर्वांच्या उपस्थितीत शिंदे यांच्या शिवसेनेत त्यांचा प्रवेश झाला आहे.

राजू पारवे पक्षप्रनेशानंतर म्हणाले, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) , गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मी जाहीरपणे आभार मानतो. या सर्वांच्या नेतृत्वात आता मी काम करणार असल्याचे त्यांनी सांगितलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com