Khamgaon Political News : खामगाव येथे काँग्रेसचे माजी आमदार दिलीपकुमार सानंदा व काँग्रेस सेवादलाचे कार्याध्यक्ष तेजेंद्रसिंह चव्हाण यांच्यात हाणामारी झाली. महाविकास आघाडीची सभा संपताच रविवारी (ता. 21) रात्री नऊच्या दरम्यान हा प्रकार घडला. या घटनेमुळे काँग्रेसमधील गटबाजी चव्हाट्यावर आली आहे.
महाविकास आघाडीचे उमेदवार नरेंद्र खेडेकर Narendra Khedekar यांच्या प्रचारार्थ रविवारी खामगाव येथील जे.व्ही. मेहता महाविद्यालयाच्या मैदानावर सभा पार पडली. या वेळी शिवसेनेचे (ठाकरे गट) पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस खासदार मुकुल वासनिक यांची जाहीर सभा पार पडली. या वेळी राज्यातील व स्थानिक महाविकास आघाडीचे नेते मंचावर उपस्थित होते.
उध्दव ठाकरे Uddhav Thackeray यांचे भाषण संपताच नेते आपापल्या मार्गाने निघाले. दरम्यान, काही वेळातच खामगाव मतदारसंघाचे काँग्रेसचे माजी आमदार दिलीप कुमार सानंदा सभास्थळावरून बाहेर पडत होते. त्यावेळी समोरून काँग्रेस सेवादलाचे कार्याध्यक्ष तेजेंद्रसिंह चव्हाण यांची गाडी तेथून आली. समोरासमोर येताच या दोन्ही नेत्यांमध्ये काही कारणावरून शाब्दिक चकमक झाली. काही वेळातच त्याचे रूपांतर हाणामारीत झाले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
या वेळी काही कार्यकर्त्यांनी तेजेंद्रसिंह चव्हाण यांच्या अंगावर धावून जात हात उगारला. तसेच त्यांच्या गाडीची काचदेखील फोडली. या घटनेमुळे काही काळ गोंधळाचे वातावरण सभास्थळी निर्माण झाले होते. या वेळी पोलिसांनी मध्यस्थी करत हे प्रकरण सोडविले. या घटनेमुळे काँग्रेसमधील गटबाजी चव्हाट्यावर आली आहे.
(Edited by Sunil Dhumal)
R.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.