Maharashtra Pradesh Congress News : राज्यातील तीन शिक्षक आणि दोन पदवीधर निवडणुकांमध्ये सर्वात जास्त चर्चेत कोणता मतदारसंघ राहिला असेल तर तो म्हणजे नाशिक पदवीधर. कारण येथे युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष राहिलेले कट्टर कॉंग्रेसी सत्यजीत तांबे यांनी अपक्ष अर्ज भरून महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून दिली होती.
सत्यजीत (Satyajeet Tambe) यांचे वडील डॉ. सुधीर तांबे नाशिक (Nasik) पदवीधर मतदारसंघातून तीन वेळा आमदार राहिलेले आहेत. याही वेळी कॉंग्रेसने (Congress) त्यांनाच उमेदवारी दिली. बी फॉर्मसुद्धा दिला. पण त्यांनी ऐनवेळी उमेदवारी दाखल केलीच नाही. उलट सत्यजीत तांबे यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला. येवढ्यावरच ते थांबले नाहीत, तर या निवडणुकीत भाजप नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांना पाठिंबा मागणार असल्याची घोषणाही त्यांनी नामांकन दाखल केल्यानंतर केली.
सत्यजीत तांबेंच्या या निर्णयामुळे कॉंग्रेसच्या गोटात तर खळबळ उडालीच. पण राज्याचे राजकारण ढवळून निघाले. नाशिकमध्ये भाजपने उमेदवार न दिल्याने ही भाजपची पूर्वनियोजित खेळी होती, असे बोलले जाऊ लागले. येवढ्या सर्व घडामोडी होऊनही सत्यजीत तांबे यांनी भाजपला अद्याप भाजपला पाठिंबा मागितला नाही आणि भाजपने तो दिलासुद्धा नाही. त्यामुळे हा पेच कायम आहे. दरम्यान डॉ. सुधीर तांबे यांच्यावर कॉंग्रेसने तडकाफडकी निलंबनाची कारवाई केली. पण सत्यजीत तांबेंना त्यांनी आतापर्यंत सोडले होते.
आज दुपारी मुंबईत कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, (Nana Patole) राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड आणि शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत नाना पटोले यांनी सत्यजीत तांबे यांना आज निलंबित करणार असल्याची घोषणा केली. त्यामुळे सत्यजीत तांबे यांचे निलंबन आता अटळ मानले जात आहे. कदाचित भाजप आणि सत्यजीत तांबे या कारवाईचीच तर वाट बघत नव्हते ना, असाही प्रश्न उपस्थित होतो. आता जनतेला प्रतीक्षा आहे ती, सत्यजीत तांबे भाजपला पाठिंबा केव्हा मागतात आणि भाजप तो घोषित केव्हा करणार?
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.