भाजपने त्यांची जागा ओळखून रहावे, नाना संतापले..

नाना पटोलेंनी (Nana Patole) भाजप (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांवर (Chandrakant Patil) जोरदार टीका केली आहे.
nana patole
nana patolesarkarnama

भंडारा : भाजप (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील (Chandrakant Patil) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची (Narendra Modi) छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्याशी तुलना केल्याल्या वक्तव्याचा कॅाग्रेस (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. भाजप नेत्यांच्या डोक्यात हवा भरली असून सत्तेचा माज आला आहे. शिवाजी महाराजांच्या नावाने सत्ता मिळाल्यावर त्यांना आता त्यांचे नेते मोठे वाटतात आणि छत्रपती लहान वाटू लागले आहेत, अश्या शब्दात पटोले यांनी पाटलांवर शरसंधान साधले आहे.

nana patole
आता चंद्रकांत पाटलांची बुद्धी भ्रष्ट होते आहे...;पाहा व्हिडिओ

पटोले म्हणाले, भाजपच्या नेत्यांना डोक्यात हवा गेली असून त्यांना सत्तेचा माज आला आहे. शिवाजी महाराजांच्या नावावर त्यांनी सत्ता मिळवली. आता छत्रपती शिवाजी महाराज त्यांना छोटे वाटू लागले आहेत. शिवाजी महाराजांनी हिंदूत्व व त्यांची शान-बान वाढवली व आपल्या कर्तृत्वाने जगाला संदेश दिला. मात्र, भाजपने सत्तेसाठी त्या हिंदूत्वाला हिंदूवादी बनवून सत्तेसाठी काहीपण करा कुणाचाही जीव घ्या. देशात कृत्रिम महागाई निर्माण केली व गरिबाला, बेरोजगाराला व शेतकऱ्याला संपवले आहे.

nana patole
पडळकर म्हणाले, अखेर सरकारचा पर्दाफाश!

भाजपने हिंदूत्वाचा भगवा घालून व झेंडा हातात घेऊन देशाची दिशाभूल करण्याचे काम केले जात आहे. आता सत्ता आल्यावर त्यांना शिवाजी महाराज लहान लहान वाटत असून त्यांचे नेते मोठे वाटू लागले आहेत. शिवाजी महाराजांचा अपमान राज्यातील व देशातील जनता सहन करणार नाही भाजपने त्यांची जागा ओळखून रहावे, असे पटोलेंनी भाजपला ठणकावले आहे.

nana patole
व्होट बँकेचे राजकारण करणाऱ्यांच्या उरावर बसण्यासाठी! आव्हांडाचा पाटलांना टोला

दरम्यान, चंद्रकांत पाटील म्हणाले होते की, छत्रपती शिवाजी महाराजांनी जी हिंदू वोट बॅंक बनवली होती. त्याला कळस हा नरेंद्र मोदी आणि लालकृष्ण अडवाणी यांनी चढवला. त्यांच्या या वक्तव्यावर राज्यातील अनेक नेत्यांनी पाटील यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com