Nagpur : मराठा आरक्षण मुद्द्यावर आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांना विरोध केल्यानं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा विधानसभेचे विजय वडेट्टीवार यांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. यासंदर्भात वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिले आहे. वडेट्टीवार यांनी सुरक्षेत वाढ करण्याची मागणी केली आहे. यापूर्वीही वडेट्टीवार यांना धमक्या मिळाल्या होत्या. सध्या वडेट्टीवार हे नागपूर येथे आहेत.
वडेट्टीवार यांनी मराठा आरक्षण व ओबीसी समाजाबद्दल वक्तव्य केल्यानं त्यांना जिवे मारण्याच्या धमक्या व मॅसेज येत आहेत. वडेट्टीवार यांनी मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याला विरोध व्यक्त केला आहे. त्यामुळं मराठा समाजातून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. (Congress Leader Vijay Wadettiwar Gets Life Threat for Taking Role Against Manoj Jarange Patil on Maratha Reservation)
राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना मराठा आंदोलकांकडून जिवे मारण्याच्या धमक्या आणि मॅसेज यायला लागले आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊ नये आणि मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेचा विरोध व्यक्त केला होता. त्यामुळं त्यांना राज्यभरातून धमक्यांचे मॅसेज येत आहेत. वडेट्टीवार यांनी यासंदर्भात पत्राच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कळविले आहे.
वडेट्टीवार यांनी आपल्या सुरक्षेत वाढ करण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. सध्या वडेट्टीवार यांना विरोधी पक्षनेते असल्यानं वाय प्लस दर्जाची सुरक्षा आहे. ही सुरक्षा धमक्या मिळत असल्यानं अपुरी पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अधिक सुरक्षा देण्याची मागणी वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात केली आहे. त्यामुळे राज्य सरकार आता या मागणीकडं कोणत्या दृष्टीनं पाहते हे महत्त्वाचं असणार आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
२०१४ मध्ये महाराष्ट्रात सत्ता परिवर्तन झाल्यानंतर युतीचं सरकार आलं. त्यानंतर २०१७-१८ मध्ये मराठा समाजानं मूकमार्चा काढत आरक्षणाची मागणी लावून धरली. त्यावेळीही विजय वडेट्टीवार यांना धमक्या देण्यात आल्या होत्या. आता ओबीसी समाजावर अन्याय होऊ नये म्हणून विजय वडेट्टीवार ठाम भूमिका घेतली आहे. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात येऊ नये, अशी त्यांची भूमिका आहे. अशात वडेट्टीवार यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या संदर्भातही प्रतिक्रिया व्यक्त केल्यानं मराठा समाजातील कार्यकर्त्यांनी वडेट्टीवार यांना धमक्या देण्यास सुरुवात केली आहे. वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठविल्यानंतर आता त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्याची जबाबदारी सरकारवर येणार आहे. त्यामुळं आता गृह विभाग कोणती भूमिका घेणार याकडं राजकीय वर्तुळाचं लक्ष लागले आहे.
Edited by : Atul Mehere
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.