Congress Meeting News : राऊतांचे अजून ठरले नाही; मुत्तेमवार, ठाकरे झाले सक्रिय, पण आता चतुर्वेदी गायब?

Satish Chaturvedi : सर्व बैठकांचे अध्यक्ष राहिलेले सतीश चतुर्वेदी मात्र येथे दिसणार नाहीत.
Vikas Thakre, Vilas Muttemwar and Satish Chaturvedi
Vikas Thakre, Vilas Muttemwar and Satish ChaturvediSarkarnama
Published on
Updated on

Drama of displeasure of Congress leaders : महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा एका दिवसावर येऊन ठेपली आहे आणि कॉंग्रेस नेत्यांच्या नाराजीचे नाट्य अजूनही संपण्याचे नाव घेत नाहीये. आधी नाना पटोले येणार की नाही, हा संभ्रम होता. काल माजी मंत्री नितीन राऊत नाराज असल्याचे कळले आणि आजपर्यत बैठकांमध्ये अंतर राखून असलेले कॉंग्रेसचे शहराध्यक्ष विकास ठाकरे आणि ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार सक्रीय झाले आहेत. (A meeting has been organized this evening)

विकास ठाकरे आणि मुत्तेमवार सक्रिय झाले, त्यांनी आज सायंकाळी बैठक आयोजित केली आहे. पण या बैठकीला आजवरच्या सर्व बैठकांमध्ये अध्यक्ष म्हणून उपस्थित असलेले सतीश चतुर्वेदी नसणार आहेत. कारण या गटाने त्यांना निमंत्रण दिले नसल्याची सूत्रांची माहिती आहे. सुरुवातीला दर्शन कॉलनीचे मैदान देण्यापासून वज्रमूठ बैठक चर्चेत आली ती आजही कॉंग्रेस नेत्यांच्या राजी-नाराजीमुळे चर्चेतच आहे.

मागील पंधरा दिवसांपासून महाविकास आघाडीच्या सभेच्या तयारीपासून अंतर राखून असलेले माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार आणि शहर काँग्रेसचे अध्यक्ष आमदार विकास ठाकरे अचानक सक्रिय झाले आहेत. शनिवारी त्यांनी या संदर्भात बैठक बोलावली आहे. आजवर झालेल्या सर्व बैठकांचे अध्यक्ष राहिलेले सतीश चतुर्वेदी मात्र येथे दिसणार नाहीत.

महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपली आहे. उद्या दर्शन कॉलनीतील पटांगणावर सायंकाळी सहा वाजता ही सभा होणार आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते अजित पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण या सभेला येणार आहेत.

Vikas Thakre, Vilas Muttemwar and Satish Chaturvedi
Nagpur News : नितीन गडकरी बिनधास्त पण नाना पटोलेंचे असणार कडवे आव्हान; असे असेल गणित!

सभेच्या नियोजनाची जबाबदारी माजी मंत्री आमदार सुनील केदार यांच्यावर सोपवण्यात आली आहे. सभेची घोषणा करण्यासाठी केदार यांनी घेतलेल्या पहिल्या पत्रकार परिषदेत माजी मंत्री सतीश चतुर्वेदी उपस्थित होते. सोबत राजेंद्र मुळक, प्रफुल्ल गुडधे, तानाजी वनवे, अशोक धवड, नरेंद्र जिचकार आदी मंडळी झाडून उपस्थित होती. शहराध्यक्ष विकास ठाकरे मात्र कुठे दिसले नाही.

याबाबत विचारणा केली असता ते आजारी असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर वज्रमूठ सभेसंदर्भात अनेक बैठका झाल्या. त्यालाही ठाकरे व व त्यांचे समर्थक उपस्थित नव्हते. विधानसभानिहाय बैठकांचे अध्यक्ष सतीश चतुर्वेदी असल्याने ठाकरे यापासून अंतर राखून होते. गुरुवारी दक्षिण नागपूर (Nagpur) विधानसभा मतदारसंघाची बैठक घेण्यात आली. केदार, चतुर्वेदी या बैठकीला उपस्थित होते.

Vikas Thakre, Vilas Muttemwar and Satish Chaturvedi
Congress Leaders News : काँग्रेसच्या निवडणूक समन्वय समितीत नाहीत केदार आणि वडेट्टीवार !

माजी आमदार अशोक धवड यांनी ही बैठक बोलावली होती. याच मतदारसंघात आज विकास ठाकरे (Vikas Thakre) यांनी बैठक बोलावली आहे. या बैठकीचे ते स्वतः अध्यक्ष आहेत. या बैठकीला माजी केंद्रीयमंत्री विलास मुत्तेमवार, माजी मंत्री आमदार सुनील केदार, (Sunil Kedar) आमदार अभिजित वंजारी प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.

दत्तात्रयनगर येथील महाकाळकर सभागृहात सायंकाळी सात वाजता ही बैठक होणार आहे. विशेष म्हणजे निमंत्रितांमध्ये सतीश चतुर्वेदी यांच्यासह इतरांच्या नावांचा उल्लेख टाळण्यात आला आहे. सर्व पदाधिकारी व माजी नगरसेवक असा उल्लेख करण्यात आला आहे.

Edited by : Atul Mehere

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com