Amravati News : साडेचारशे भाविकांना महाकुंभला सोडून युवा स्वाभिमानीच्या कार्यकर्त्याचा पळ; खासदार वानखडेंची रवी राणांवर सडकून टीका

Congress MP Balwant Wankhade MLA Ravi Rana Amravati Mahakumbh Mela : काँग्रेस खासदार बळवंत वानखडे यांनी आमदार रवी राणा यांचे नाव न घेता जोरदार टीकास्त्र सोडलं आहे.
Amravati News
Amravati NewsSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमानी पक्षाच्या कार्यकर्ता सुरज मिश्रा याने अमरावतीमधून सुमारे साडेचारशे भाविकांना महाकुंभ मेळाव्याला घेऊन जात तिथंच सोडून पळ काढला.

याप्रकरणी अमरावतीमधील फ्रेजरपुरा पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली जात असून, यावर काँग्रेस खासदार बळवंत वानखडे यांनी आमदार राणा यांचे नाव न घेता जोरदार टीकास्त्र सोडले आहे.

प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळावा सुरू आहे. अमरावतीमधून (Amravati) वाहनांमधून तब्बल साडेचारशे भाविकांना सुरज हा प्रयागराजमध्ये घेऊन गेला होता. यासाठी भाविकांकडून प्रत्येकी सहा हजार रुपये पैसे घेतले होते. भाविकांना तिथं गेल्यावर त्यांची काहीच व्यवस्था नव्हती. जेवणाची आणि राहण्याची व्यवस्था नव्हती. यातून भाविकांनी हेंडसाळ झाली. भाविकांची तीन दिवस जेवण आणि झोपण्याची व्यवस्थाच झाली नाही.

Amravati News
Budget 2025 Announcement : मोदींनी काय काय स्वस्त केलं; कॅन्सर औषधांपासून ते मोबाईलपर्यंत...

भाविक सुरज मिश्रा याच्याविरोधात आक्रमक झाले असून पोलिसांकडे (Police) फसवणुकीची तक्रार केली. सुरज मिश्रा हा आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमानी पक्षाचा कार्यकर्ता असल्याने त्याच्या विरोधात तक्रार नोंद करून घेण्यासाठी पोलिसांनी टाळाटाळ केली. त्यामुळेच भाविक अधिक संतप्त झाले.

Amravati News
Chandrashekhar Bawankule : नागपूरला एक्स्ट्रा हजार कोटी देणार; पालकमंत्री बावनकुळे यांची घोषणा

यानंतर भाविकांनी पोलिस मुख्यालय इथं जात गृहराज्यमंत्री भोयर यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. पण त्या ठिकाणीही त्यांना अडवलं गेलं. अखेर पोलिस उपायुक्तांनी फ्रेजरपुरा पोलिसांना भाविकांची तक्रार नोंदवून घेण्याचा आदेश दिला. भाविकांची तक्रार पोलिस नोंदवून घेत नसल्याचे समजल्यावर काँग्रेस खासदार बळवंत वानखडे यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

खासदार वानखडे यांनी आमदार रवी राणा यांचं नाव न घेता त्यांच्यावर सडकून टीका केली. "मोफत प्रयागराज यात्रा करतो म्हणून सांगितलं. अनेक लोकांची फसवणूक केली. पैसे लुबाडले. त्यांची व्यवस्था केली नाही. या भाविकांना वाऱ्यावर सोडलं. हाल केले. हिंदुत्वाच्या ठेकेदारांनी या सुद्धा दलाली केली", अशी टीका खासदार बळवंत वानखडे यांनी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com