Congress : नाना पटोलेंचा ‘तो’ निर्णय कॉंग्रेस अध्यक्षांच्या सूचनेनुसारच, अतुल लोंढेंचे स्पष्टीकरण...

Atul Londhe : आघाडीचा धर्म पाळत मित्रपक्षाच्या निर्णयाचा शिवसेनेने मान राखायला हवा.
Atul Londhe
Atul LondheSarkarnama

State Congress Spokesperson Atul Londhe News : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विधानसभा अध्यक्षपदाच्या राजीनाम्यावर ‘सामना’तून केलेली टीका अयोग्य आहे. नाना पटोले यांनी तडकाफडकी वा घिसाडघाईने तो निर्णय घेतलेला नव्हता. तर तो काँग्रेसच्या तत्कालीन राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या सूचनेनुसार घेतला होता, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी स्पष्ट केले.

आघाडीचा धर्म पाळत मित्रपक्षाच्या निर्णयाचा शिवसेनेने मान राखायला हवा, अशा शब्दांत अतुल लोंढे यांनी शिवसेनेने सामनातून केलेल्या टीकेचा समाचार घेतला. ते म्हणाले, काँग्रेस पक्षात एक निर्णय प्रक्रिया आहे. त्यानुसारच निर्णय घेतले जातात. पक्षाध्यक्षांनी एखादा निर्णय घेतला की पक्षातील सर्व जण त्याचा मान राखतात व त्यानुसार त्याची अंमलबजावणीही केली जाते. सोनिया गांधी यांनी त्यावेळची राजकीय परिस्थिती पाहून पक्षहितासाठी घेतलेला तो निर्णय होता.

नाना पटोलेंच्या राजीनाम्यानंतर महाविकास आघाडी सरकारसमोर संकटाची मालिका सुरू झाली. या आरोपात काहीही अर्थ नाही. जर नाना पटोले विधानसभा अध्यक्षपदी कायम असते, तर पुढचा प्रसंग टळला असता, या ‘जर-तर’ ला राजकारणात काहीच अर्थच नसतो. नाना पटोले यांच्या विधानसभा अध्यक्षपदाच्या राजीनाम्यामुळेच महाविकास आघाडी सरकार अडचणीत आले, असे म्हणणेही योग्य नाही, त्याला इतरही काही कारणे असू शकतात, असे लोंढे म्हणाले.

Atul Londhe
अतुल लोंढे म्हणाले, एमआयएमने काँग्रेसची चिंता करू नये...

काँग्रेस (Congress) पक्षाने काय निर्णय घ्यावेत, हा काँग्रेस पक्षाचा अंतर्गत विषय आहे. काँग्रेसचा निर्णय चुकीचा ठरला, असा आरोप करून मित्रपक्षाच्या निर्णयावर आक्षेप घेणे व त्यावर अशी जाहीरपणे टीका करणे आघाडीच्या धर्माला अनुसरून नाही, असेही लोंढे (Atul Londhe) म्हणाले. सध्या सुरू असलेल्या बाळासाहेब थोरात आणि नाना पटोले (Nana Patole) यांच्या वादावर बोलण्याचे अतुल लोंढे यांनी टाळले. सद्यःस्थितीत सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपांच्या बाबतीत पक्षश्रेष्ठी काय तो निर्णय घेतील आणि पक्षातील सर्वांनाच तो लागू असेल, असेही लोंढे यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com