Congress News : मदतीतून फडणवीसांचा जिल्हा वगळला, जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांचे आंदोलन...

ZP : संतप्त पदाधिकाऱ्यांनी आंदोलन करून शासनाच्या या कृतीचा निषेध केला.
Congress Agitation.
Congress Agitation.Sarkarnama
Published on
Updated on

जिल्ह्यात गत मार्च महिन्यात झालेला अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले. यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. परंतु यानंतरही नुकसान भरपाई देताना त्यातून नागपूर जिल्ह्याला वगळल्यामुळे जिल्हा परिषदेच्या संतप्त पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करून शासनाच्या या कृतीचा निषेध केला.

जिल्हा परिषदेतील सत्तापक्षातील पदाधिकारी, सदस्य आणि माजी पदाधिकारी यांनी या आंदोलनात भाग घेत जिल्हाधिकारी कार्यालयापुढे धरणे आंदोलन करून जिल्ह्याला अवकाळी पाऊस व गारपिटीची नुकसानी भरपाई मिळावी, अशी मागणी केली. मागणीचे निवेदनही त्यांनी यावेळी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाकडे सादर केले. निवेदनानुसार, मार्च महिन्यात झालेल्या पावसामुळे सुमारे ३३ टक्क्यांवर शेती पिकांचे नुकसान झाले आहे.

जिल्हा प्रशासनाकडून शासनाकडे (State Government) ९.०७ कोटीच्या मदत निधीची मागणी करण्यात आली. हा मदत नि(धी तात्काळ जिल्ह्याला उपलब्ध करून देण्यात यावा, ही आंदोलकांची प्रमुख मागणी होती. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) अर्थमंत्री आणि नागपूर (Nagpur) जिल्ह्याचेही पालकमंत्री आहेत.

शेतकऱ्यांना (Farmers) नुकसान भरपाई देण्यात नागपूर जिल्ह्याचा समावेश अग्रक्रमाने करायला हवा होता. असे न करता शासनाने नागपूर जिल्हाच यादीतून वगळला. परिणामी शेतकरी मदतीपासून वंचित राहिले. त्यामुळे जिल्हा परिषदेतील पदाधिकाऱ्यांनी आज धरणे आंदोलन केले. यात बव्हंशी कॉंग्रेसच्या नेत्यांचा समावेश होता.

Congress Agitation.
Congress Leaders News : काँग्रेसच्या निवडणूक समन्वय समितीत नाहीत केदार आणि वडेट्टीवार !

या आंदोलनात जिल्हा परिषद अध्यक्षा मुक्ता कोकड्डे, उपाध्यक्षा कुंदा राऊत, महिला व बाल कल्याण सभापती प्रा. अवंतिका लेकुरवाळे, कृषी सभापती प्रवीण जोध, शिक्षण सभापती राजकुमार कुसुंबे, समाज कल्याण सभापती मिलिंद सुटे, माजी अध्यक्ष रश्मी बर्वे, माजी उपाध्यक्ष मनोहर कुंभारे, सदस्य उज्ज्वला बोढारे, अरुण हटवार, दुधराम सव्वालाखे, नेमावली माटे, प्रकाश खापरे, दिनेश ढोले, सूनिता ठाकरे, अर्चना भोयर, देवानंद कोहळे, अरुणा शिंदे, रुपाली मनोहर, दिशा चनकापुरे, वंदना मोटघरे, माधुरी देशमुख, गीतांजली नागभिडकर, मंगला निंबोने, महेंद्र डोंगरे, पिपळा डाकबंगला सरपंच विष्णू कोकड्डे, चेतन देशमुख, स्वप्नील श्रावणकर यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते..

(Edited By : Atul Mehere)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com