Congress News : कॉंग्रेसचे विदर्भातील ‘हे’ तीन नेते करणार समान नागरी कायद्याचा अभ्यास !

Uniform Civil Law : ही समिती समान नागरी कायद्याचा अभ्यास करणार आहे.
Vasant Purke, Anis Ahmed and Kishor Gajbhiye
Vasant Purke, Anis Ahmed and Kishor GajbhiyeSarkarnama
Published on
Updated on

Three leaders from Vidarbha were included : समान नागरी कायद्याचा अभ्यास करण्यासाठी प्रदेश काँग्रेस कमिटीच्यावतीने स्थापन करण्यात आलेल्या समितीत विदर्भातील तीन नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे. काँग्रेसने माजी खासदार तसेच प्रसिद्ध अर्थतज्ञ भालचंद्र मुगणेकर यांच्या अध्यक्षतेखाली नऊ सदस्यांची समिती स्थापन केली आहे. ही समिती समान नागरी कायद्याचा अभ्यास करणार आहे. (This committee will study the Uniform Civil Code)

केंद्र शासनाने समान नागरी कायदा लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र यास काँग्रेस व अनेक राजकीय पक्षांचा विरोध आहे. देशात विविध धर्म व जातीचे लोक राहतात. प्रत्येक धर्माची आणि जातीची संस्कृती आणि कायदे आहेत. मुस्लिम, पारसी, ख्रिश्चन यांचे पर्सनल लॉ आहेत. समान नागरी कायद्यामुळे या धर्मांना एकच कायदा लागू होणार आहे.

दक्षिण भारत, ईशान्य भारत तसेच आदिवासी समाजांमध्ये लग्न परंपरा आणि वारसा हक्काच्या परंपरा भिन्न आहेत. समान नागरी कायद्यामुळे या धर्मांच्या अडचणी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याविषयी संभ्रमाची स्थिती आहे. या कायद्याच्या संभाव्य परिणामांचा अभ्यास करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी उपरोक्त समिती स्थापन केली आहे.

समान नागरी कायदा लागू करण्यासाठी भाजप आग्रही आहे. काही राज्यांमध्ये या कायद्याच्या अंमलबजावणीस प्रारंभ करण्यात आला आहे. भाजपने काश्मीर (Kashmir) मधील ३७० कलम यापूर्वी हटविले आहे. राम मंदिराच्या उभारणीस प्रारंभ केला आहे.

Vasant Purke, Anis Ahmed and Kishor Gajbhiye
Congress चे तेलंगणा प्रभारी Manikrao Thackeray यांची टीका | KCR | BRS Maharashtra | Telangana

आता समान नागरी कायदा लागू करण्याचे भाजपने (BJP) ठरविले आहे. त्यामुळे असंतोष निर्माण झाला आहे. या कायद्याचा अभ्यास करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीमध्ये काॅंग्रेसचे (Congress) माजी मंत्री अनिस अहमद, वसंत पुरके आणि माजी सनदी अधिकारी व कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष किशोर गजभिये यांचा समावेश आहे.

Edited By : Atul Mehere

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com