Nagpur : हिवाळी अधिवेशन महायुतीचं सत्ताधारी म्हणून शेवटचं अधिवेशन ठरणार

Nana Patole : नव्या वर्षात नवं सरकार दिल्लीसह महाराष्ट्रात दिसणार असल्याचा केला दावा
Congress Leader Nana Patole.
Congress Leader Nana Patole.Google
Published on
Updated on

Congress On BJP : उपराजधानी नागपूर येथे होणारं विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन महायुतीचं सत्ताधारी म्हणून शेवटचं अधिवेशन ठरणार आहे. नव्या वर्षांत केंद्रात आणि महाराष्ट्रात नवं सरकार जनतेला बघायला मिळणार आहे, असा दावा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी केला.

महाराष्ट्रातील जनतेच्या मागण्यांसाठी काँग्रेस अधिवेशन काळात विधिमंडळावर महामोर्चा काढणार आहे. पटोले यांनी सोमवारी (ता. 4) नागपूर येथे या मोर्चाची माहिती दिली. (Congress State President Nana Patole Claimed In Nagpur That New Government Will Be Seen In The Center & State In 2024)

Congress Leader Nana Patole.
Nagpur : तीन राज्यांतील जनतेचा कौल मान्य, त्रुटी सुधारत कामाला लागलोय

महायुतीची उलटगितनी सुरू झालीय. त्याचं नागपुरातील अधिवेशन सत्ताधारी या नात्यानं शेवटचं अधिवेशन असेल. जनता त्यांना असा धडा शिकवेल की यापुढं ते सत्ताधारी कधीच राहणार नाही, असा दावा पटोले यांनी केला. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी जनतेच्या अनेक मुद्द्यांवर सोमवारी (ता. 11) महामोर्चा काढणार आहे. राज्यभरातील काँग्रेस नेते, खासदार, आमदार, पदाधिकारी आणि लाखो कार्यकर्ते मोर्चात सहभागी होणार आहेत. या मोर्चाच्या माध्यमातून हे सरकार किती खोटारडं आहे, याची जाणीव मंत्र्यांना करून देणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

विदर्भातील अनेक महत्त्वाचे मुद्दे आहेत. शेतकऱ्यांना अवकाही पावसामुळं झालेल्या नुकसानाची मदत अद्याप मिळालेली नाही. तरुणाईच्या हाताला रोजगार नाही. सरकारनं त्यांना वाऱ्यावर सोडलय. मात्र काँग्रेस त्यांच्या पाठिशी उभी राहणार आहे. वारंवार सरकारमधील मंत्री खोटं बोलत आहेत. मदत करणार असं केवळ सांगत आहेत. परंतु प्रत्यक्षात मदत करीत नाहीत. खासगी विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांना एक रूपयात विमा देण्याचा निर्णय जाहीर करीत आपली पाठ सर्वांनी थोपटुन घेतली. मात्र पिकविमा कंपन्या शेतकऱ्यांना एक रूपया, दोन रूपये अशी भरपाई देत त्यांची थट्टा करीत असल्याबद्दल पटोले यांनी संताप व्यक्त केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

केंद्रात आणि राज्यात निवडणूक घ्यायला सत्ताधारी घाबरत आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकही त्यांनी रोखल्या आहेत. उपराजधानी नागपूरचे अनेक प्रश्न आहेत. मिहानचा गाजावाजा करण्यात आला. परंतु येथे कोणतेही मोठे उद्योग नाहीत. किती तरूणांना रोजगार मिळाला, याची आकडेवारीच जाहीर केली जावी. नागपुरात मोठी प्रवाही नदी नाही, समुद्र नाही. त्यानंतरही नागपूरसारखं शहर पुरात बुडतं आणि सरकार काहीच करू शकत नाही, हा प्रकार हास्यास्पद असल्याची टीका पटोले यांनी केली. अशा सर्व विषयांवर मोर्चा काढणार आहोत. यात महाविकास आघाडीतील पक्ष सोबत आलेत तर त्यांचं स्वागतच आहे, असं त्यांनी नमूद केलं.

Edited by : Atul Mehere

Congress Leader Nana Patole.
Nagpur Vijay Wadettiwar : महाराष्ट्रात जातीवाद फोफावतोय; त्यातूनच होताहेत हत्या

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com