
Congress Spokeperson on BJP : केवळ आणि केवळ गुजरातच्या निवडणुकीसाठी वेदांता-फॉक्सकॉन हा प्रकल्प गुजरातला नेण्यात आला होता. त्यापाठोपाठ टाटा एअरबसचा प्रकल्पही लांबवण्यात आला. आम्ही तेव्हाच सांगितले होते की, हा प्रकल्प गुजरातला होणे शक्य नाही. अखेर ते खरे ठरले, असे म्हणत कॉंग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा समाचार घेतला. (The country has lost around 10 lakh crores)
आज (ता. ११) नागपुरात पत्रकार परिषदेत लोंढे म्हणाले, निवडणुकीच्या काळात गुजरातच्या जनतेला खूश करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातून पळवलेल्या सेमिकंडक्टर प्रकल्पाच्या करारातून फॉक्सकॉन कंपनीने माघार घेतल्याने देशाचे तब्बल १० लाख कोटींचे नुकसान झाले आहे.
वेदांता-फॉक्सकॉन कंपनीचा हा प्रकल्प पुणे येथे प्रस्तावित होता. गुजरातमध्ये विधानसभा निवडणूक असल्याने तो महाराष्ट्रातून पळवण्यात आला होता. आता फॉक्सकॉन कंपनीने या प्रकल्पात गुंतवणूक करण्यास नकार दिला आहे. भाजपच्या राजकारणामुळे हे सर्व घडल्याचा आरोपही लोंढे यांनी पत्रकार परिषदेत केला.
हा प्रकल्प पुण्यात स्थापन करण्यासंबंधात जवळपास सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्या होत्या. तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने सर्व सुविधा देण्याची तयारी दर्शवली होती. या प्रकल्पात दीड लाख कोटींची गुंतवणूक आणि एक लाख लोकांना रोजगाराची संधी मिळणार होती. या प्रकल्पासाठी पुण्यातील वातावरण अनुकूल होते.
विमानतळ, पोर्ट, चांगले रस्ते, पाणी, पुरेशी वीज, कुशल मनुष्यबळ आदी सर्व काही उपलब्ध होते. या प्रकल्पाला काही सवलती देण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेत बैठक झाली होती. गुजरात (Gujrat) राज्यातील ज्या भागात हा प्रकल्प नेण्यात आला होता, तेथे काहीच सुविधा उपलब्ध नव्हत्या. केवळ राजकीय (Political) स्वार्थासाठी केंद्र सरकारने या प्रकल्पाचा बळी दिल्याचे अतुल लोंढे यांनी सांगितले.
मायक्रॉनही संकटात ?
फॉक्सकॉन व वेदांता कंपनीचा कारार संपुष्टात आल्याने मायक्रॉनच्या सेमिकंडक्टर प्रकल्पाचेही भवितव्यसुद्धा धोक्यात आले आहे. याशिवाय विदेशी गुंतवणुकीवरसुद्धा याचा विपरीत परिणाम होणार आहे. या संदर्भात केंद्र सरकारने (Central Government) श्वेत पत्रिका जारी करावी, अशी मागणी अतुल लोंढे (Atul Londhe) यांनी केली.
Edited By : Atul Mehere
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.