Shegaon Bazar Samiti Result : आमदार संजय कुटेंना काँग्रेसचा धक्का; शेगावात भाजपचा सुपडा साफ

Bazar Samiti Result : शेगाव बाजार समिती भाजप आमदार संजय कुटे यांच्या मतदारसंघात आहे.
Sanjay Kute News
Sanjay Kute News Sarkarnama

Shegaon Bazar Samiti Result : शेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसने बाजी मारली आहे. 18 जागासाठी झालेल्या या बाजार समितीच्या निवडणुकीत 38 उमेदवार रिंगणात होते. यामध्ये सहकार पॅनल व शेतकरी पॅनल मध्ये झालेल्या सरळ लढतीत, सहकार पॅनलच्या सर्वच उमेदवारांनी मोठया फरकाने शेतकरी पॅनलचा सफाया केला.

काँग्रेस (Congress), राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरे गटाचे सहकार पॅनल होते. तर शेतकरी पॅनल हे भाजप व शिंदे गट आणि वंचित बहुजन आघाडी यांचे होते. शेगाव मतदार संघ हा भाजपचा (BJP) गड असून संजय कुटे (Sanjay Kute) हे विद्यमान आमदार आहेत. मात्र, या बाजार समितीच्या निवडणुकीत भाजपचे संजय कुटे यांना मोठा धक्का बसला आहे.

Sanjay Kute News
Renapur APMC Result News : लातूरनंतर रेणापूरातही देशमुखांचाच डंका, बिनविरोधसह सर्व १७ जागांवर विजय..

आज झालेल्या निवडणुकीत 98 टक्के मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला होता. मतदानानंतर लगेचच मतमोजणीची प्रक्रिया स्थानिक मुरारका कॉलेजमध्ये पार पडली. सहकार पॅनलने सर्वच्या सर्व जागा जिंकत इतिहासात घडवला. सहकार पॅनलने सर्वच्या सर्व जागा जिंकत, शेतकरी पॅनलचा ध्रुवा उडवत शेगांव बाजार समिती मध्ये एका हाती सत्ता मिळवली आहे. महाविकास आघाडीच्या एक हाती सत्ता आली असून शेगाव बाजार समितीवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकला आहे.

विजयी उमेदवार...सहकारी संस्था सर्वसाधारण मतदारसंघातून, पाटील श्रीधर पांडुरंग, मिरगे गोपाळ वामनराव, दळी तेजराव भीमराव, उमाळे रमेश मनोहर, थारकर योगेश एकनाथ, हिंगणे परमेश्वर विष्णू, निळे दादाराव साहेबराव, सहकारी संस्था महिला राखीव मतदार संघातून, पुंडकर मित्रवृंदा श्रीधर, शेळके सौ अर्चना संजय, सहकारी संस्था विमुक्त भटक्या जाती मतदारसंघातून भारसाकडे संतोष श्रीकृष्ण.

सहकारी संस्था इतर मागासवर्ग मतदार संघातून धुमाळे वासुदेव किसन, ग्रामपंचायत मतदार संघ सर्वसाधारण मधून उन्हाळे सुरेश नामदेव, तायडे श्रीकांत सुखदेव, ग्रामपंचायत अनुसूचित जाती जमाती मतदारसंघातून गव्हांदे संजय महादेवराव, ग्रामपंचायत आर्थिक दुर्बल मतदारसंघातून लांजुळकर अमोल देवलाल, व्यापारी अडते मतदारसंघातून पाटील विठ्ठल गजानन, टेकडीवाल रितेश ओमप्रकाश, तसेच हमाल मापारी मतदारसंघातून गुलाब खान भुरेखान, यांनी विजय मिळवला आहे.

Sanjay Kute News
Sonpeth Bazar Samitee : सर्व पक्षीय मिळून ताकद लावली, पण अखेर राष्ट्रवादीनेच बाजी मारली...

आज पार पडलेल्या निवडणुकीत भाजप प्रणित असलेल्या शेतकरी पॅनलचा दारुण पराभव झाला आहे. सहकार पॅनलचे नेतृत्व सहकार नेते पांडुरंग दादा पाटील काँग्रेस नेते ज्ञानेश्वर दादा पाटील यांनी केले. या निवडणुकीत निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून बी. एन. कोल्हे ,तर निवडणूक निरीक्षक म्हणून तहसीलदार समाधान सोनवणे यांनी काम पाहिले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com