Devendra Bhuyar : 'तलवारीने हात छाटू,' म्हणणारे राष्ट्रवादीचे आमदार भुयार अडचणीत ; काँग्रेस आक्रमक

Devendra Bhuyar : "राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोणत्याही कार्यकर्त्याला हात लावण्याचा प्रयत्न केल्यास तलवारीने हात छाटून टाकू. जुना देवेंद्र भुयार अंगात आणायला लावू नका,"
Devendra Bhuyar
Devendra Bhuyar sarkarnama
Published on
Updated on

Devendra Bhuyar : "राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या कुठल्याही कार्यकर्त्यांना धक्का लावला तर तलवारीने हात छाटल्याशिवाय राहणार नाही," असे विधान करणं आमदार देवेंद्र भुयार यांच्या अंगाशी आले आहे. त्यांच्याविरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. अमरावती जिल्ह्यातील वरुड येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्यात आमदार देवेंद्र भुयार यांनी हे प्रक्षोभक विधान केले आहे.

"राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोणत्याही कार्यकर्त्याला हात लावण्याचा प्रयत्न केल्यास तलवारीने हात छाटून टाकू. जुना देवेंद्र भुयार अंगात आणायला लावू नका," असं आव्हान देवेंद्र भूयार यांनी काँग्रेसला दिल होतं,त्यामुळे आमदारांनी कुठल्या चौकात यावे ते सांगावे, असे आव्हानच पंचायत समिती सभापती तथा काँग्रेस नेते विक्रम ठाकरे यांनी दिले. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांनी वरुडच्या महात्मा गांधी पुतळ्यासमोर सभा घेऊन आमदारांचा निषेध केला, तसेच याप्रकरणी वरूड पोलीस ठाण्याकडे तक्रार दिली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी मंत्री एकनाथ खडसे व्यासपीठावर होते. त्यावेळी जनतेला संबोधित करताना देवेंद्र भुयार यांनी हे वादग्रस्त विधान केले आहे.

Devendra Bhuyar
Sharad Pawar : शेलारांसोबत युती का केली ? : पवारांचे स्पष्टीकरण ; म्हणाले, 'ते काम आमचं..'

देवेंद्र भुयार म्हणाले, "कुणी म्हणतो भुयार भाजपमध्ये चालला पण मला जायचे असते तर तेव्हाच गेलो असतो, गुजरातमार्गे गुवाहाटीत अन् खोके घेऊन आलो असतो. आता कोरड्या भाकरीवर जाऊ का नागपूरकडे जायचे असते तर आधीच गेलो असतो. पैशांचा आपला विषय नाही. मी शेती करायला सक्षम आहे, माझे हात काही बांधले नाहीत.चुकीच्या पद्धतीने राजकारण करणे हा माझा स्वभाव नाही. भुयार पैसे घेतो का, भुयारचे काही वेगळे धंदे आहेत का? याचा शोध घेतला जातो पण मी सांगतो, मला काही लोक जाणीवपूर्वक बदनाम करण्याचा प्रयत्न करीत आहेत,"

"बरेच लोक म्हणत होते की, मागच्यावेळी फुकट निवडणूक जिंकली आता पुढच्या वेळी काय? समोरची निवडणूक कठीण आहे कस करायचे. पण मी त्यांना सरळ सांगतो की, ज्या दिवशी निवडणुकीत चिकन, मटण आणि पैसे वाटायचे काम येईल त्या दिवशी राजकारणाचा धंदा सोडून शेती करायला जाईल. वडिलांची अठरा एकर शेती आहे,"असे भुयार म्हणाले.

भुयार म्हणाले, "निवडणूक आली की, देशमुख विरुद्ध पाटील असा सामना रंगवला जातो. जातीचे विष पेरले जाते. मुंबईच्या ठाकरेंची दहशत काल, आज आहे आणि उद्याही असेल, तुमची दहशत नदीच्या काठापर्यंतच आहे. आमच्या नादाला लागायचे नाही,"

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com