नागपूर : उत्तर प्रदेशात आरपीआयचे वर्चस्व होते. जास्तीत जास्त खासदार आमचे तेथून निवडून येत होते. नंतर मात्र बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावतींनी तेथे आमची जागा बळकावली. मायावती यांचा विरोध नाही. पण त्यांनी आरपीआयची जागा बळकावल्याची टीका आरपीआय (आठवले) गटाचे प्रमुख व केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली.
प्रकाश आंबेडकरांप्रमाणे रामदास आठवले यांनीही आता रिपल्बिकन ऐक्याच्या भाषेपासून फारकत घेतली आहे. आरपीआय ऐक्य शक्य नसल्याने पक्ष वाढीवर भर देणार असून येणाऱ्या निवडणुका भाजपसोबत मिळून लढणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दीक्षाभूमीला अभिवादन करण्यासाठी आठवले नागपुरात आले होते. आज रवी भवन येथे पत्रकार परिषदेत ते म्हणाले की, उत्तर प्रदेशमधील निवडणुका पुढील वर्षी फेब्रुवारी महिन्यात आहेत. तेथे स्वबळावर लढून आम्हाला यश येणार नाही. आम्ही केंद्र सरकारचा एक घटक पक्ष आहो. त्यामुळे भाजपसोबतच तेथे लढण्याचा आमचा विचार आहे.
भाजप आरपीआयला त्या निवडणुकीत सोबत घेईल, याची शक्यता वाटत आहे. त्यामुळे भाजपच्या साथीने आम्ही उत्तर प्रदेशात यश मिळवू. ब्राम्हण सम्मेलन घेणार आहोत. त्यानंतर १८ डिसेंबरला मोठा मेळावा होणार आहे. ८ ते १२ जागा मागू. जम्मू आणि काश्मीरला आतंकवादी हल्ले करत आहेत. त्यामुळे तेथे सर्जिकल स्ट्राईक करण्याची आवश्यकता पडू शकते, असे अमित शहा म्हणाले. पण त्या स्ट्राईकचा उत्तर प्रदेशच्या निवडणुकीशी काही संबंध नाही, असे आठवले यांनी सांगितले. दीक्षाभूमीला घोषित केलेला निधी सरकारने द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली. दलित पॅंथरच्या धरतीवर भारतीय दलित पॅंथर सुरू करण्याची घोषणाही त्यांनी केली.
...तर प्रत्येक आंदोलनामुळे कायदे रद्द करावे लागतील
केंद्राने केलेले कृषी कायदे शेतकरी हिताचे आहेत. सरकार त्यात सुधारणा करण्यास तयार आहे. फक्त आंदोलनामुळे कायदे रद्द केले तर चुकीचा संदेश जाईल. प्रत्येक आंदोलनामुळे कायदे रद्द करावे लागतील. त्यामुळे सरकार ते कायदे रद्द करणार नाही. त्यात सुधारणा होऊ शकते, असे आठवले म्हणाले.
ईडी, सीबीआय आणि इतर केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून छापा टाकून काटा काढण्याचे काम केंद्र सरकारकडून सुरू असल्याचा आरोप महाविकास आघाडी सरकारकडून सातत्याने करण्यात येतो. पण आम्ही छापा टाकून काटा काढत नाही, तर काटा काढून मग छापा टाकतो, असे रामदास आठवले म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.