रामदास आठवले म्हणाले, आम्ही काटा काढून छापा टाकतो...

उद्योग स्थापन करण्यासाठी जाणाऱ्या लोकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. त्यामुळे सर्जिकल स्ट्राईक करण्याची गरज गृहमंत्री अमित शहा Amit Shaha यांनी बोलून दाखविल्याचे आठवले Ramdas Athavale म्हणाले.
रामदास आठवले
रामदास आठवलेsarkarnama

नागपूर : ईडी, सीबीआय आणि इतर केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून छापा टाकून काटा काढण्याचे काम केंद्र सरकारकडून सुरू असल्याचा आरोप महाविकास आघाडी सरकारकडून सातत्याने करण्यात येतो. पण आम्ही छापा टाकून काटा काढत नाही, तर काटा काढून मग छापा टाकतो, असे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले आज येथे म्‍हणाले.

धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दीक्षाभूमीला अभिवादन करण्यासाठी आठवले नागपुरात आलेले आहेत. दरम्यान आज दुपारी रवी भवन येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी उपरोक्त विधान केले. ते म्हणाले, उत्तर प्रदेशमधील निवडणुका पुढील वर्षी फेब्रुवारी महिन्यात आहेत. तेथे स्वबळावर लढून आम्हाला यश येणार नाही. आम्ही केंद्र सरकारचा एक घटक पक्ष आहो. त्यामुळे भाजपसोबतच तेथे लढण्याचा आमचा विचार आहे. शक्तिपरीक्षणासाठी तेथे रॅली काढणार आहोत. त्यानंतर लढण्याबाबत निर्णय घेतला जाईल.

एकटे निवडणूक लढल्यास पराभव होण्याचीच शक्यता अधिक आहे. त्यामुळे पडण्यासाठी उभे राहण्यापेक्षा निवडून येण्यासाठी कशा पद्धतीने उभे राहता येईल, यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. भाजप आरपीआयला त्या निवडणुकीत सोबत घेईल, याची शक्यता वाटत आहे. त्यामुळे भाजपच्या साथीने आम्ही उत्तर प्रदेशात यश मिळवू. भाजपला आमचा फायदाच होणार आहे. कारण पश्‍चिम बंगालमध्ये कॉंग्रेस आणि कम्युनिस्टांना फारशी मते मिळाली नाही आणि भाजपच्या ९५ जागा या फक्त ५०० ते १५०० मतांच्या फरकाने हरलेल्या आहेत. हा फरक जर भरून काढता आला असता, तर भाजपला १८० ते १९० जागांवर विजय मिळाला असता, असे आठवले म्हणाले.

उत्तर प्रदेशातही योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा सरकार स्थापन होण्यात कुठलीही अडचण येणार नाही. मागच्या वेळी ३१२ जागा मिळाल्या होत्या, यावेळीही ३००चा आकडा पार करण्याचे लक्ष्य भाजपने ठेवले आहे. जम्मू काश्‍मीरमधील ३७० कलम हटविल्यानंतर तेथे तिरंगा फडकला आहे. मी दोन वेळा जम्मू आणि काश्‍मीरला जाऊन आलो. तेथील मुस्लीम लोकांनी माझे चांगले स्वागत केले. जनतेमध्ये चांगले वातावरण आहे. केवळ नेत्यांकडूनच विरोध होतो आहे. आतंकवादी तेथे पुन्हा पुन्हा हल्ले करत आहेत. त्यामुळे तेथे सर्जिकल स्ट्राईक करण्याची आवश्‍यकता पडू शकते, असे अमित शहा म्हणाले. पण त्या स्ट्राईकचा उत्तर प्रदेशच्या निवडणुकीशी काही संबंध नाही, असे आठवले यांनी सांगितले.

रामदास आठवले
रामदास आठवले यांनी सांगितला भाजप-शिवसेना युतीचा फॉर्म्युला...

पाकिस्तानकडून आतंकवादी पाठवून अशा प्रकारचे हल्ले केले जात आहेत. याच हल्ल्यात एका दलित व्यक्तीची हत्या करण्यात आली. त्यामुळे तेथे उद्योग स्थापन करण्यासाठी जाणाऱ्या लोकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे आणि ही पाकिस्तानची चाल आहे. त्यामुळे सर्जिकल स्ट्राईक करण्याची गरज गृहमंत्री अमित शहा यांनी बोलून दाखविली असल्याचेही त्यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com