Nagpur : शत्रुचे बॉम्ब निकामी करण्यासाठी वायुसेनेत दाखल होणार दक्ष रोबोट...

Robot : या रोबोटमध्ये तब्बल एक हजार किलो विस्फोटक निकामी करण्याची क्षमता आहे.
Indian Science Congress
Indian Science CongressSarkarnama
Published on
Updated on

Indian Science Congress News : बॉम्ब निकामी करताना मोठ्या प्रमाणात जीवहानी होण्याची शक्यता असते. अशावेळी २ किलोमीटर दूर बसून कुठल्याही जीवितहानीशिवाय ते निकामी करण्याचे तंत्रज्ञान संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेद्वारे (डीआरडिओ) विकसित करण्यात आले आहे. दक्ष (युएक्सओआर) असे या रोबोटिक तंत्रज्ञानाचे नाव आहे.

नागपुरात (Nagpur) सुरू असलेल्या भारतीय विज्ञान कॉंग्रेसच्या अधिवेशनात आज ही माहिती देण्यात आली. या रोबोटद्वारे तब्बल एक हजार किलो विस्फोटक निकामी करण्याची क्षमता विकसित करण्यात आली आहे. हे तंत्रज्ञान लवकरच वायुसेनेच्या ताफ्यात दाखल होणार आहे. विदेशी सैन्याशी लढत असताना अनेकदा सीमेवर लॅन्ड माइन्स आणि इतर स्फोटके पेरण्यात येतात. अशावेळी आपल्या सैन्यासाठी ते घातक ठरतात. अशा स्फोटकांना निकामी करण्यासाठी अनेकदा मनुष्य यंत्रणा कमी पडते. त्यामुळे वायुसेनेमार्फत (Air Force) संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेला (डीआरडिओ) एक टास्क देण्यात आले. त्यातून दक्ष (युएक्सओआर)ची निर्मिती करण्यात आली.

जवळपास १ हजार किलो विस्फोटके निकामी करता येणे सहज शक्य होते. रोबोटिक तंत्रज्ञानामुळे हे दोन किलोमीटर अंतरावरून सहजरीत्या वापरता येत असल्याने मानवी हानीची शक्यता जवळपास नसल्यासारखी आहे. विशेष म्हणजे जेसीबीच्या आकाराच्या असलेल्या या उपकरणाला ११ कॅमेरे लागले आहेत. त्यांतून परिसरातील इत्यंभूत माहिती घेता येणे सहज शक्य होते. दोन आर्म हे समोर येणारा प्रत्येक अडथळा पार करण्यासाठी मदतीचे ठरतात. त्यामुळे येणाऱ्या काळात ते केवळ वायुसेनेलाच नव्हे तर स्थल सेनेलाही अतिशय उपयुक्त ठरणार आहे.

Indian Science Congress
Fadanvis : विज्ञान आणि तंत्रज्ञानासाठी स्त्री -पुरूष आणि जाती-धर्म भेद नसतो...

संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेद्वारे (डीआरडिओ) विकसित करण्यात आलेले दक्ष अद्ययावत तंत्रज्ञान आता वायुसेनेच्या ताफ्यात दाखल होणार आहे. त्यासाठी वायुसेनेद्वारे टास्क देण्यात आले होते. त्यामुळे स्फोटके निकामी करण्यात ते अतिशय मदतगार ठरणारे असल्याची माहिती डीआरडिओ डिझाईन टीमच्या कथीका रॉय यांनी भारतीय विज्ञान कॉंग्रेसच्या नागपुरात सुरू असलेल्या अधिवेशनात दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com