Daryapur APMC News : कॉंग्रेस श्रेष्ठींनी बंद लिफाफ्यात पाठवली नावे, सभापतिपदी गावंडे !

Congress : विरोधी गटात असलेल्या शेतकरी पॅनलकडून कोणताही अर्ज भरण्यात आला नव्हता.
Daryapur APMC
Daryapur APMCSarkarnama

Amravati District's Daryapur APMC Election News : दर्यापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या झालेल्या निवडणुकीत काँग्रेसप्रणीत सहकार पॅनलला बहुमताने विजय मिळाल्यावर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतिपदावर आता कोणाची वर्णी लागणार, याकडे साऱ्यांचेच लक्ष लागले होते. आज झालेल्या निवडणुकीत सभापतिपदी सुनील गावंडे, तर उपसभापतिपदी राजू कराळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. (Sunil Gawande, Raju Karale were elected unopposed)

शुक्रवारी (ता. १९) सकाळी ११ वाजता सुरू झालेल्या निवडणूक प्रक्रियेत दर्यापूर बाजार समिती परिसरातील हॉलमध्ये सर्व निवडून आलेल्या संचालकांची सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी विरोधी गटात असलेल्या शेतकरी पॅनलकडून कोणताही अर्ज भरण्यात आला नसल्याने सभापतिपदावर निवड ही बिनविरोध होणार असल्याचे दृष्टिक्षेपात आले होते.

यावेळी काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींनी बंद पाकिटामध्ये निवड झालेल्यांची नावे लिहून पाठवली होती. उपस्थित संचालकांच्या सभेमध्ये हे बंद पाकीट उघडून सभापतिपदावर सुनील गावंडे, तर उपसभापतिपदावर राजू कराळे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. सदर निवड ही बिनविरोध झाली आहे. निवडून आलेल्या सभापती व उपसभापती यांच्यासह सर्व संचालक आणि कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.

सहकार क्षेत्रात काँग्रेसचा दबदबा कायम असल्याचे चित्र जिल्ह्यातील १२ बाजार समितीच्या निवडणुकीतून पुन्हा स्पष्ट झाले आहे. केंद्र व राज्यात सत्ता असताना व सहकार मंत्रालयाच्या माध्यमातून दबाव तंत्राचा वापर केल्यानंतरही भाजपला जिल्ह्यात केवळ एका बाजार समितीवर विजय मिळवता आला, तो ही काँग्रेसच्या असंतुष्टांच्या मदतीने. तर, प्रहार व अपक्ष पॅनल घेऊन उतरलेल्या एका सहकार नेत्याला आपला परंपरागत गढ राखता आला.

जिल्ह्यात राज्यसभेचे खासदार, अपक्ष खासदाराचे समर्थन, एक आमदार व विधान परिषद सदस्य असलेल्या भाजपला (BJP) जिल्ह्यात सहकाराची मोट बांधता आली नाही. १२ही बाजार समितीत त्यांनी स्थानिक नेत्यांना हाताशी धरून पॅनल लढविले. मात्र वरूड वगळता इतर ११ ठिकाणी मात खावी लागली. २१६ सदस्यांपैकी २५ सदस्य निवडून आले. हा पराभव भाजपला अमरावती जिल्ह्यातील (Amravati) ग्रामीण मतदारांचा कौल दर्शविणारा असतानाच डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा आहे.

डॉ. अनिल बोंडे (Dr. Anil Bonde) यांनी वरूड जिंकून लाज राखण्याचा प्रयत्न केला आहे. मोर्शी बाजार समितीवर आमदार देवेंद्र भुयार यांना माजी मंत्री हर्षवर्धन देशमुख यांच्यामुळे इभ्रत वाचविता आली. माजी राज्यमंत्री बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी परंपरागत चांदूर बाजार जिंकत गढ राखला असला तरी त्यांना अचलपूमध्ये हारी खावी लागली. सहकार नेते अभिजित ढेपे यांनी त्यांचा वडिलोपार्जित नांदगाव खंडेश्वरचा गढ राखण्यात यश मिळवले. धारणी बाजार समितीत बहुपक्षीय पॅनलने यश मिळवले असून आमदार राजकुमार पटेल यांना त्याचे यश आहे.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com