Nagpur Winter Session : विदर्भातील प्रश्नांसाठी अजितदादाही नेमणार खास ‘ओएसडी’

Ajit Pawar : वित्त व नियोजन विभागातील कामांसाठी जनतेच्या मुंबईवाऱ्या निर्णयामुळं होणार कमी
DCM Ajit Pawar.
DCM Ajit Pawar.Google

Major Initiative : राजकारणात स्पष्ट वक्तेपणा, निर्णय घेण्याची क्षमता, प्रशासनावरील पकड व शिस्तीसाठी ओळखल्या जाणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विदर्भातील जनतेसाठी महत्त्वाचा निर्णय घेतलाय. शासकीय कामांसाठी विदर्भातील जनतेला मुंबईवाऱ्या करण्याचा होणारा त्रास बघता दादांनी आता विदर्भासाठी स्वतंत्र विशेष कार्य अधिकारी (Officer On Special Duty) नियुक्त करण्याचा निर्णय घेतलाय.

नागपुरातून दादांच्या विभागातील विशेष कार्य अधिकारी (OSD) वित्त व नियोजन विभाग व उपमुख्यमंत्री कार्यालयाशी संबंधित कामकाज बघणार आहे. राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे सुरू असताना पवार यांनी हा महत्त्वाचा निर्णय घेतलाय.

DCM Ajit Pawar.
Nagpur Winter Session : 'जस्ट वाव... लुक’मध्ये अजितदादांची 'मेट्रो राइड'

हिवाळी अधिवेशनाच्या निमित्तानं नागपुरात आल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विदर्भातील नागरीक व राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या भेटी घेतल्या. नागपूर, अमरावती, भंडारा, गडचिरोली येथे दौऱ्यातही त्यांनी जनतेला नेमक्या कोणत्या अडचणी येत आहेत याची माहिती घेतली. त्यावेळी विदर्भातून कामाच्या निमित्तानं सातत्याने नागरीकांना मुबंईत येणे-जाणे करावे लागत असल्याची बाब त्यांच्या ध्यानात आली.

विदर्भाच्या कोणत्याही जिल्ह्यातून मुंबईत येणे-जाणे करण्यासाठी लागणारा वेळ, खर्च आणि श्रम याची कल्पना दादांना होतीच. अशातच एकाच फेरीत मुंबईच्या मंत्रालयातील काम होईलच याची हमी नसते. त्यामुळं जनतेला होणारा त्रास उपमुख्यमंत्री पवार यांच्या लक्षात आला. त्यामुळं त्यांनी विदर्भासाठी स्वतंत्र अधिकारी नेमण्यात येईल असं जाहीर केलय. त्यामुळं यापुढं दादांच्या विभागाशी संबंधित कोणत्याही कामासाठी विदर्भातील जनतेला थेट मुंबईत जाण्याचं काम पडणार नाही.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राज्यातील महायुतीच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून काम करताना अजित पवार यांनी सर्वच प्रदेशांसाठी समतोल निधी वाटपाचा कार्यक्रम हाती घेतलाय. अशातच त्यांनी विदर्भातील विकास कामांसाठीही मोठ्या प्रमाणावर निधी वित्त विभागाकडून उपलब्ध करून दिलाय. शासकीय तिजोरीच्या चाव्या आपल्याकडं असल्यानं खर्च होणारा निधी सदुपयोगी व सार्थकी लागवा, यासाठी अजित पवार यांचा जोर आहे.

अशातच विदर्भातील विकास कामांच्या मुद्द्यावरही दादा फ्रंटफूटवर आहेत. ओएसडी नियुक्तीचा निर्णय हा त्यातूनच घेण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. विदर्भातून मुंबईसाठी सुरू होऊ घातलेल्या या कार्यालयीन ‘कनेक्टिव्हिटी’मुळे विविध कामांसाठी निधी खेचून आणणं व नियोजन विभागाकडून प्रस्ताव मंजूर करून घेणं विदर्भातील आमदारांनाही सोयीचं होणार आहे. त्यामुळं अजित दादांच्या विदर्भातील या ‘पावरफूल’ निर्णयाची सकारात्मक चर्चा महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चांगलीच रंगलीय.

Edited by : Prasannaa Jakate

DCM Ajit Pawar.
महायुतीत मिठाचा खडा पडणार ? ; अजित पवार जागावाटपाबाबत बघा काय म्हणाले ? | Ajit Pawar On NDA |

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com