Buldhana Ravikanat Tupkar : सरकार झुकलं; उपमुख्यमंत्र्यांनी चर्चेसाठी बोलावलं

Farmer's Protest : फडणवीस ऐकणार मागण्या, न्याय न मिळाल्यास तुपकर घेणार मंत्रालयाचा ताबा
Ravikant Tupkar & Devendra Fadnavis.
Ravikant Tupkar & Devendra Fadnavis.Google

Mumbai Mantralaya : कापूस आणि सोयाबीनच्या मुद्द्यावर सुरू असलेल्या आंदोलनापुढं सरकार झुकल्याचं दिसत आहे. शेतकऱ्यांनी मंत्रालयावर ताबा घेण्यापूर्वीच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेत रविकांत तुपकर यांना चर्चेसाठी बोलावलं आहे. बुधवारी (ता. 29) सह्याद्री अतिथीगृह येथे ही चर्चा होणार आहे.

बुलडाणा जिल्ह्यातील सोमठाणा येथे अन्नत्याग करीत असलेल्या तुपकर यांनी मंगळवारी (ता. 28) शेतकऱ्यांसह मुंबईकडं कूच केली. तुपकर यांचा प्रवास सुरू होताच, त्यांना उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी चर्चेसाठी बोलावून घेतलं. (DCM Devendra Fadnavis Called Farmer's Leader Ravikant Tupkar From Buldhana For Negotiation At Mumbai Mantralaya)

Ravikant Tupkar & Devendra Fadnavis.
Buldhana Ravikant Tupkar : शेतकऱ्यांसह मंत्रालयाकडं कूच, मनोज जरांगेंचाही फोन

शेतकरी हितासाठी अनेक दिवसांपासून आंदोलन करीत असलेल्या तुपकर यांनी बुलडाण्यातील सभेदरम्यान सरकारला आठवडाभराची मुदत दिली होती. त्यानंतरही सरकारनं दखल घेतली नाही तर 29 नाव्हेंबरला मंत्रालय ताब्यात घेण्याचा इशारा त्यांनी दिला होता. आपल्या भूमिकेवर ते सुरुवातीपासूनच ठाम होते. त्यामुळं बुलडाणा शहर पोलिसांनी त्यांना अटक केली. पोलिसांची अटक करण्याची पद्धत चुकीची असल्याचं नमूद करीत न्यायालयानं तुपकर यांची त्याच दिवशी जामिनावर मुक्तता केली होती.

न्यायालयातून बाहेर येताच तुपकर यांनी सोमठाणा या आपल्या मूळ गावी अन्नत्याग आंदोलन सुरू केलं. शेतकरी नेते सदाभाऊ खोत, सप्तखंजेरी वादक सत्यपाल महाराज, मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्यासह विविध नेत्यांनी व संघटनांनी तुपकर यांना पाठिंबा दिला. अशात ठरल्याप्रमाणं मंगळवारी दुपारी तुपकर शेतकऱ्यांसह मुंबईच्या दिशेने रवाना झाले. प्रशासनानं ही बाब कळविताच सरकारनं हालचाली सुरू केल्या.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासाठी पुढाकार घेत तुपकर व शेतकऱ्यांना चर्चेसाठी बोलावलं. यासंदर्भातील पत्र बुलडाणा जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी तातडीनं प्रवासात असलेल्या तुपकरांना दिले आहे. सरकारनं चर्चेसाठी बोलावल्याबद्दल तुपकर यांनी समाधान व्यक्त केलं. बुधवारी मुंबईतील मंत्रालयात तुपकर व त्यांचे समर्थक शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी वाटाघाटी करणार आहेत.

सरकारनं शेतकऱ्यांच्या मागण्या फेटाळल्यास मंत्रालयाचा ताबा घेणारच, असा ठाम इशारा तुपकर यांनी दिला आहे. आमचं कोणत्याही नेत्याशी किंवा सरकारशी वैर नाही. आम्ही शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी लढत आहोत. शेतकरी अडचणीत आहे, हे सरकारनं समजून घेतलं पाहिजे, असं तुपकर म्हणाले. सरकारशी चर्चा पूर्ण होत नाही आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कोणताही तोडगा निघत नाही तोपर्यंत अन्नत्याग कायम राहणार असल्याचं तुपकर यांनी ‘सरकारनामा’शी बोलताना स्पष्ट केलं.

Edited by : Prasannaa Jakate

Ravikant Tupkar & Devendra Fadnavis.
Buldhana Ravikant Tupkar : पोटात अन्न नसलेल्या तुपकरांची पोलिसांना वाटतेय भीती

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com