Devendra Fadnavis : साहेब, तुम्ही याच कपड्यांवर अंघोळीला जाता का? फडणवीसांनी सांगितला किस्सा

Makeover : राज्याच्या समतोल विकासावर शासन भर देणार असल्याचं केलं स्पष्ट
Devendra Fadnavis & Amruta Fadnavis
Devendra Fadnavis & Amruta FadnavisGoogle
Published on
Updated on

Nagpur Political News : नगरसेवकापासून मुख्यमंत्री पदापर्यंत आणि आता दिल्लीत प्रचंड वजन असलेल्या नेत्यांपैकी एक म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडं पाहिलं जातं. गेल्या अनेक वर्षांपासून फडणवीस एकच प्रकारच्या वेशभूषेत दिसतात. पांढरा शर्ट, पॅन्ट आणि त्यावर जॅकेट. ही वेशभूषा जणू फडणवीस यांचा गणवेशच झालाय की काय, अशी चर्चा असते. आपल्या या वेशभूषाबद्दल फडणवीस यांनी शनिवारी (ता. १८) नागपूर येथील देवगिरी निवासस्थानावर खास आपल्या शैलीत किस्सा सांगितला.

फडणवीस म्हणाले की, आपण आधी फारसं मॅचिंग शर्ट, मॅचिंग पॅन्ट, मॅचिंग जॅकेट वैगरे भानगडीकडं लक्ष देत नव्हतो. परंतु एक दिवस योगायोग घडला अन‌् आपण तो क्षण कॅश केला. (DCM Devendra Fadnavis Tells The Story of His Matching Dressing Style While Discussion at Nagpur)

पत्नी अमृता आपल्याला सातत्यानं म्हणायच्या की, मॅचिंगकडं लक्ष देत जा, पण आपण ते फारसं मनावर घेत नव्हतो. अशात एक दिवस अमृता फडणवीस आणि आपण घातलेल्या ड्रेसचं तंतोतंत मॅचिंग झालं. हा योगायोग होता, पण पत्नीनं विचारल्यानंतर लगेच उत्तर दिलं की, आज तुम्ही काय परिधान करणार आहे, यावर मी लक्ष ठेवलं अन‌् तसाच मॅचिंग ड्रेस काढला. हा निव्वळ योगायोग होता, पण त्यामुळं पत्नी खूश झाली, त्याचं समाधान मिळालं. बरेचदा आपल्या काही लोक मस्करीत विचारताही, की साहेब, तुम्ही याच कपड्यांवर अंघोळीला जाता का हो? कारण राजकीय जीवनात आल्यापासून वेगळ्या वेशभूषेत लोकांनी आपल्याला पाहिलेलेच नाही ना, असा खुमासदार किस्सा फडणवीस यांनी शेअर केला.

शनिवारी देवगिरी येथे फडणवीस यांनी अनेक मुद्द्यांवर पत्रकारांशी अनौपचारिक चर्चा केली. त्यावेळी ते मनमोकळ्या गप्पांमध्ये रंगून गेले होते. उपराजधानी नागपूरचा चेहरामोहरा बदलतोय. समृद्धी महामार्गामुळं नागपुराला अधिकच महत्त्व प्राप्त झालंय. लवकरच समृद्धी महामार्गाच्या परिसरात लॉजिस्टिक हब उभारण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. यातून विदर्भातील वाशीम, बुलडाणा, यवतमाळ जिल्ह्यांनाही मोठा फायदा होईल. नागपूरनंतर उद्योगवाढीच्या दृष्टीनं अमरावती येथे सर्वाधिक लक्ष केंद्रित करणार असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

विदर्भाच्या विकासाबद्दल बोलत असताना राज्याचा इतर भागांकडं दुर्लक्ष होणार, असं मुळीच नाही. आम्ही सर्व समतोल विकासावर भर देत आहोत. नागपुरातील मेट्रोचा विस्तार, राज्यातील अन्य मेट्रो प्रकल्पांना चालना आगामी काळात दिसेल. राज्यात मोठे उद्योग कसे येतील, याचा प्रयत्न सुरू आहे. मोठ्या शहरांमधील वाहतुकीच्या समस्येवर तोडगा निघालेला दिसेल. समृद्धी महामार्गावरील अपघात आणखी कमी करण्यासाठी प्रयत्न असतील. समृद्धीमुळं वऱ्हाडातील विकासाला चालना मिळेल. हा बदल एका रात्रीतून दिसणारा नाही. पण त्याची सुरुवात झालीय, असं फडणवीस म्हणाले.

मराठा, ओबीसी, धनगर आरक्षण यांच्यासह सर्वच समाजांच्या मुद्द्यांवर सरकार गंभीरपणे काम करतेय. कुणाचाही हक्क मारला जाणार नाही, यासाठी प्रामाणिक प्रयत्न सुरू आहेत. राज्यातील कृषी, शेतकरी, वीज उत्पादन, वीजपुरवठा, सिंचनाचे प्रश्न, नक्षलवाद, गुन्हेगारीला आळा, कायदा व सुव्यवस्था अशा सर्वंकष मुद्द्यांवर सगळेच मंत्री सकारात्मकपणे काम करताहेत. वाढतं प्रदूषणही मोठी समस्या आहे. त्यामुळं या विषयावरही आगामी काळात काम करावं लागणार आहे. राज्याशी संबंधित असे अनेक मुद्दे हिवाळी अधिवेशनात पटलावर येतीलच. त्यासाठी सरकार म्हणून तयारी सुरू आहे, असं फडणवीस यांनी नमूद केलं.

Edited by : Atul Mehere

Devendra Fadnavis & Amruta Fadnavis
Gadkari & Fadnavis on Nagpur Flood : गडकरी म्हणाले, अंबाझरी कुणाचं बाळ, सगळे विभाग घेताहेत एकमेकांवर आळ

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com