Condolences to MLA Govardhan Sharma : ‘लालाजी’ गेलेत यावर विश्वासच बसत नाही, उपमुख्यमंत्री फडणवीस भावूक

DCM Devendra Fadnavis : आमदार गोवर्धन शर्मा यांच्या पार्थिवाचं घेतलं अंत्यदर्शन
DCM Devendra Fadnavis visiting residence of MLA Govardhan Sharma in Akola
DCM Devendra Fadnavis visiting residence of MLA Govardhan Sharma in AkolaSarkarnama
Published on
Updated on

Akola News : ‘काही नेते जवळ फोन असतानाही लवकर उपलब्ध होत नाहीत. मात्र, आमचे ‘लालाजी’ तसे नव्हते. जवळ फोन नसतानाही ते जनतेसाठी कायम उपलब्ध असायचे. त्यांचा ‘पर्सन टू पर्सन’ संपर्क असायचा. तो संपर्क कधीही तुटला नाही’, असा उल्लेख करीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अकोला पश्चिमचे आमदार गोवर्धन शर्मा यांना श्रद्धांजली अर्पण केली.

प्रदीर्घ आजारामुळं भाजपचे आमदार गोवर्धन शर्मा यांचं शुक्रवारी (ता. ३) निधन झालं. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक नेत्यांनी शनिवारी (ता. ४) अकोला गाठत आमदार शर्मा यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं व शर्मा परिवाराला धीर दिला. गेल्या तीन दशकांपासून एकाच मतदारसंघातून सलग आमदार राहिलेले ‘लालाजी’ गेलेत यावर अद्यापही विश्वास बसत नाही, असं नमूद करताना फडणवीसही भावूक झाले. (DCM Devendra Fadnavis's Condolences to BJP MLA Govardhan Sharma of Akola West)

अकोलेकरांना ‘लालाजी’ म्हणून परिचित असलेले आमदार गोवर्धन शर्मा अत्यंत निःस्वार्थी नेता होते. त्यांनी कधीही कोणत्याही पदासाठी, मंत्रिपदांसाठी मोह केला नाही. विधानसभेच्या निवडणुकीत उभे राहण्यासाठी भाजपचे नेते लालाजींच्या पाठीमागे लागायचे. पक्ष त्यांना बळजबरीनं निवडणुकीत उभं करायचा, असं फडणवीस म्हणाले. आमदार शर्मा यांना सत्तेचा लोभ कधीच नव्हता. लोकांच्या सुखदुःखात धाऊन जाणारे व्यक्ती म्हणून त्यांची ख्याती होती.

तंत्रज्ञान, सोशल मीडिया याची चिंता आमदार शर्मा यांनी कधी केली नाही. परंतु लोकांच्या मनात घर करणारं त्यांचं ‘सोशल नेटवर्किंग’ खूपच बळकट होतं. लोकांनाही त्याची सवय होती. त्यामुळं लालाजी आणि मतदारांमध्ये कधीही विसंवाद झाला, असं कधीच घडलं नाही. भाजपसह सर्वपक्षीय नेत्यांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. पक्षीय राजकारण विसरून ते सर्व जाती-धर्माच्या नागरिकांसाठी काम करायचं हे त्यांचं वैशिष्ट्य होतं, असं देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केलं.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आमदार गोवर्धन शर्मा यांच्या निधनामुळं अकोल्यासह पश्चिम विदर्भात भाजपचं मोठं नुकसान झालंय. त्यांच्या सारखा सच्चा स्वयंसेवक, लोकांमध्ये राहून लोकांसाठी झटणारा नेता मिळणं अवघड आहे. अकोल्यासह पश्चिम विदर्भात भाजपचं ‘नेटवर्क’ बळकट करण्यासाठी आमदार शर्मा यांनी जे प्रयत्न केले, त्यामुळे अनेक वर्षांपर्यंत भाजपचा गड अकोल्यासह पश्चिम विदर्भात भक्कम राहिला. संपूर्ण भारतीय जनता पार्टी आणि पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता शर्मा परिवाराच्या दु:खात सहभागी आहे, असंही फडणवीस यांनी नमूद केलं.

(Edited By : Prasannaa Jakate)

DCM Devendra Fadnavis visiting residence of MLA Govardhan Sharma in Akola
Akola Maratha News : ...तर जिल्ह्यात मंत्र्यांचे कार्यक्रम उधळून लावू, सकल मराठा समाजाचा प्रशासनाला इशारा !

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com