अकोला : ''छत्रपती शिवाजी महाराजांनी १२ बलुतेदार, १८ अलुतेदारांच्या हातात तलवार देवून त्यांना त्याकाळात व्यवस्थेत सहभागी करून घेतले. मात्र, त्यानंतरच्या काळात ओबीसींचा केवळ वापर करण्यात आला. आता संविधान बदलण्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे राष्ट्रीय स्वंयसेवक संघ (rss) व भाजपच्या (bjp) नादाला लागू नका,'' असे मत वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी व्यक्त केले. यावेळी आरएसएस आणि भाजपवर आंबेडकर यांनी सडकून टीका केली.
प्रकाश आंबेडकर म्हणाले, ''राष्ट्रीय स्वयंसेवक संघ-भाजपव्यतिरिक्तही अनेक राजकीय पक्ष हिंदूंचे असून, त्या पक्षांत हिंदू आहेत. आरएसएस-भाजप वगळता अन्य कोणत्याही पक्षाला मतदान करा, संविधानाशी प्रामाणिक असलेला पक्ष सत्तेवर असायला हवा,'' ते ओबीसी महासंघातर्फे पार पडलेल्या मेळाव्यात बैठकीत बोलत होते.''आता संविधान बदलण्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे आरएसएस-भाजपच्या नादाला लागू नका,'' असे प्रकाश आंबेडकर म्हणाले. तर मतदानाच्या दिवशी शबाब, कबाब आणि महात्मा गांधी( पैसे) या पासून दूर राहून मतदान करा, कारण मतदान झालं की, कुणी शबाब देणार नाही. असेही आंबेडकर म्हणाले.
'देशाचा स्वतंत्र दिवस हा काळा दिवस म्हणून संघाने पाळला. तर पाकिस्तानचा स्वतंत्र दिन हा साजरा केला,'' अशी टीका आंबेडकर यांनी केली. ओबीसी मेळाव्याला जिल्ह्यासह बाहेर जिल्ह्यातून मोठ्या संख्येने ओबीसी समाज सहभागी झाला होता.
संजय राऊतांचा मोर्चा परवानगीविनाच ; पोलिसांकडून कारवाईचे संकेत
औरंगाबाद : महागाईच्या विरोधात आज औरंगाबादमध्ये (Aurangabad) शिवसेनेनं ‘आक्रोश मोर्चा’ (ShivSena Morcha) काढला होता. शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी या ‘आक्रोश मोर्चा’चे नेतृत्व केलं. राऊत यांच्या नेतृत्वाखाली क्रांती चौक ते गुलमंडी असा महागाई विरोधातला मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. ''महागाईविरोधात जनतेचा हा आक्रोश मोर्चा देशातील पहिला मोर्चा असून याचा आवाज दिल्ली पर्यंत पोहोचेल,'' असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला. शिवसेनेनं काढलेल्या या मोर्चाची परवानगी शिवसेनेनं घेतली नसल्याचे समोर आले आहे. आता मोर्चाच्या आयोजकांवर गुन्हा दाखल होणार का, असा प्रश्न विचारला जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.