Devendra Fadanvis News : कर्ज वाटपात बॅंकांचा आखडता हात, उपमुख्यमंत्र्यांच्या गृहजिल्ह्यात शेतकरी सावकारांच्या दारी !

Nagpur : अद्याप ५० टक्के शेतकऱ्यांनाही कर्ज मिळाले नाही.
Devendra Fadanvis
Devendra FadanvisSarkarnama
Published on
Updated on


Nagpur District's Farmers News : उद्योगपती, व्यापारी, बिल्डरांना कर्ज देण्यात अग्रेसर असणाऱ्या बॅंका शेतकऱ्यांना कर्ज देण्यास फारसे उत्सुक नसल्याचे चित्र आहे. पेरणी तोंडावर आली असताना अद्याप ५० टक्के शेतकऱ्यांनाही कर्ज मिळाले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना नाइलाजाने सावकरांकडे जाण्याची वेळ येणार आहे. (Time will come for farmers to go to money lenders unwillingly)

मान्सूनला विलंब झाल्याने अद्याप पेरण्या शेतकऱ्यांनी केली नाही. परंतु तयारी पूर्ण झाली. बियाणे, खतांची तजवीज करून ठेवली. अनेक शेतकऱ्यांना कापूस, सोयाबीन उशिरा विकला. चांगला भाव मिळेल, अशी अपेक्षा होती. परंतु भाव पडले अन् त्यांचा चेहराही पडला. त्यामुळे पैशासाठी अनेकांना कर्ज घेण्याची तयारी केली.

कर्जासाठी बॅंकांच्या पायऱ्या चढल्या. परंतु बॅंकांकडून त्यांना फारसा प्रतिसाद मिळत नाहीये. यावर्षी नागपूर जिल्ह्याला १४३० कोटी ६६ लाख रुपये कर्ज वाटप करण्याचे उद्दिष्ट होते. साधारणतः १ लाख २२ हजार ९२६ शेतकऱ्यांना हे कर्ज वितरित होईल, अशी अपेक्षा होती. परंतु कर्ज वाटपात बॅंकांनी आखडता हात घेतल्याचे दिसत आहे. १५ जूनपर्यंत ३७ हजार ३९८ शेतकऱ्यांना ४९८ कोटी ४० लाख २१ हजारांचे कर्ज वाटप करण्यात आले.

मागील वर्षाच्या तुलनेत ही आकडेवारी फारच कमी आहे. बॅंकांकडून कर्जासाठी शेतकऱ्यांना त्रास दिला जात आहे. त्यांना कर्ज मिळण्यास बॅंकांकडून विनाकारण त्रास दिला जात असल्याचे शेतकरी सांगतात. परिणामी शेतकऱ्यांना कर्जासाठी सावकारांच्या दारात जावे लागत असल्याचे चित्र दिसत आहे.

Devendra Fadanvis
जाणून घ्या महाराष्ट्राच्या राजकारणात नेमकं काय घडलं होतं ? | Shivsena | CM Shinde | DCM Fadanvis

सरकारच्या आवाहनाला केराची टोपली..
राज्य सरकारने (State Govrnment) शेतकऱ्यांना बिनदिक्कत कर्ज पुरवठा करण्याच्या सूचना राष्ट्रीयकृत बॅंकांना केल्या होत्या. परंतु बॅंकांना सरकारच्या आवाहनाला केराची टोपली दाखवल्याचे दिसते. त्यामुळे आता अशा बॅंकांवर सरकार काय कारवाई करते, हेच पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

शेतकऱ्यांना (Farmers) खऱ्या अर्थाने आता पैशाची गरज आहे. शेतकरी प्रामाणिक आहे. परंतु त्यालाच कर्ज देताना बॅंकांकडून अडवणूक केली जाते, हे योग्य नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा करण्यास टाळाटाळ व त्रास देणाऱ्या बॅंकांवर शासनाने कडक कारवाई केली पाहिजे. फक्त इशारा देवून काहीच होणार नाही. शासनाने कृती करावी, असे जिल्हा परिषदेच्या (ZP) उपाध्यक्ष कुंदा राऊत यांनी म्हटले आहे.

Edited By : Atul Mehere

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com