Devendra Fadnavis News: सावनेरमध्ये कुठलाही नवीन प्रयोग आम्हाला करायचा नाही !

Sunil Kedar : सावनेर हा कॉंग्रेसचे हेवीवेट नेते सुनील केदार यांचा मतदारसंघ आहे.
Devendra Fadanvis
Devendra FadanvisSarkarnama

Nagpur District's Saoner News : एक जागा अजून राहिलेली आहे. ती जागादेखील २०२४च्या निवडणुकीत आपण निश्‍चितपणे जिंकून दाखवू, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्‍हणाले. हे सांगताना त्यांनी इतिहासातील एक दाखलाही दिला. कुणालाही आपल्या पक्षात यायचे असल्यास तो येऊ शकतो, पण पक्षात आला म्हणजे तिकीट मिळेल, असं कुणी समजू नये, असेही ते म्हणाले. (While saying this, he also gave an example from history)

आज (ता. १९) नागपूर (Nagpur) जिल्ह्यातील सावनेर येथे फडणवीसांची सभा झाली, त्यावेळी ते बोलत होते. सावनेर हा कॉंग्रेसचे हेवीवेट नेते सुनील केदार (Sunil Kedar) यांचा मतदारसंघ आहे. त्यामुळे फडणवीसांच्या आजच्या सभेला विशेष महत्व आहे. यावेळी भाजपचे (BJP) माजी जिल्हाध्यक्ष डॉ. पोतदार विधानसभा निवडणूक लढणार नाहीत. त्यांच्या या भूमिकेचे विश्‍लेषणही यावेळी फडणवीसांनी केले.

डॉ. पोतदारांनी सांगितले की, आता ते लढणार नाहीत. ते असं का म्हणाले, हे तुमच्या लक्षात आले नाही. कारण त्यासाठी इतिहासात जावे लागेल. इतिहास बघितला असता, असं लक्षात येतं की, जेव्हा-जेव्हा धनानंद हा सत्तेने अंध झाला आणि धनानंदाची सत्ता निरंकुश झाली, त्या-त्या वेळी चाणक्य पैदा झाला अन् त्याने चंद्रगुप्त तयार केला आणि धनानंदाला खाली खेचलं. आता चाणक्याचे काम डॉ. पोतदार करणार आहेत, असे फडणवीस म्हणाले.

Devendra Fadanvis
Amruta Fadanvis : फडणवीस ब्लॅकमेल प्रकरणी मोठी अपडेट ; बुकी अनिल जयसिंघानी, त्याची मुलगी अनिक्षा..

चंद्रगुप्त तुमच्यातलाच आहे, तो कुणी बाहेरचा नसेल. याला आणत आहे का, त्याला आणत आहे का, यामध्ये तुमची अर्धी शक्ती वाया घालवता. ती शक्ती जनसंपर्कामध्ये घालवा, त्याचा जास्त फायदा होईल. पक्षाची दारं खुली आहे. ज्याला यायचं आहे, तो येईल. पण पक्षात आला म्हणून त्यालाच तिकीट मिळेल, असं होणार नाही. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) आणि मी, दोघेही तुम्हाला सांगतो. सावनेरमध्ये कुठलाही नवीन प्रयोग आम्हाला करायचा नाही. तुम्ही सगळे मिळून जे ठरवाल, तोच अंतिम निर्णय असेल, असेही फडणवीसांनी (Devendra Fadanvis) सांगितले.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com