Devendra Fadnavis Caste Census : अजितदादा म्हणाले, एकदा जातीनिहाय जनगणना होऊच द्या; पण, फडणवीसांचे सावध पाऊल

OBC Census : बिहारमधील नितीशकुमार सरकारने जातीनिहाय जनगणनेची आकडेवारी जाहीर केल्यामुळे या विषयावरून देशातील राजकारण ढवळून निघाले आहे.
Ajit Pawar, Devendra Fadnavis News
Ajit Pawar, Devendra Fadnavis NewsSarkarnama
Published on
Updated on

Nagpur News : बिहारमधील नितीशकुमार सरकारने जातीनिहाय जनगणनेची आकडेवारी जाहीर केल्यामुळे या विषयावरून देशातील राजकारण ढवळून निघाले आहे. काँग्रेस (Congress) नेते राहुल गांधी यांनी जातीनिहाय जनगणनेवरून केंद्र सरकारवर टिकेची झोड उठवली आहे. काँग्रेस शाशित राज्यामध्ये जातीनिहाय जनगणना करणार असल्याचे जाहीर केले. त्यामुळे महाराष्ट्रातही जातीनिहाय जनगणनेची मागणी होत आहे.

महाराष्ट्रातही जातीनिहाय जनगणना करण्याची मागणी विरोधी पक्षांनी केली आहे. त्यामुळे 'एकदा होऊच द्या जातीनिहाय जनगणना' असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले होते, त्यावर उपमख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उत्तर दिले. फडणवीस म्हणाले ''अजित पवार काय म्हणाले ते मी ऐकले नाही. मात्र, ओबीसी जनगणनेबाबत सरकारची भूमिका मी आधीच स्पष्ट केली आहे.

Ajit Pawar, Devendra Fadnavis News
PM Modi Shirdi Visit: मोदींच्या दौऱ्याच्या नियोजनात निरुत्साह; मंत्री विखेंनी भर बैठकीत भाजप पदाधिकाऱ्यांना झापले

जातीनिहाय जनगणना करायला सरकारने नकार दिलेला नाही. फक्त जनगणनेच्या पद्धतीचा प्रश्न आहे. बिहारमध्ये जी अडचण निर्माण झाली, ती इथे येऊ नये म्हणून भूमिका स्वीकारावी लागेल, त्यासंदर्भात सरकार निर्णय घेईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

जातीनिहाय जनगणना होऊनच जाऊ द्या. प्रत्येक वर्गात किती लोक आहेत ते समजेल. कारण त्यानुसारच निधी वाटप होते. बिहारने जनगणना केली आहे. त्यामुळे किती ओबीसी, किजी कोणता समाज आहे, ते समजेल. बिहारच्या जनगणनेसाठी हजार कोटी रुपये खर्च झाले आहेत. एवढे खर्च झाले तरी चालतील, असे पवार म्हणाले होते.

आमच्या सरकारने मराठा आरक्षण (Maratha Reservation) दिले होते. उच्च न्यायालयात ते आरक्षण टिकेल होते. तामिळनाडूनंतर ते एकमेव आरक्षण टिकले होते, मात्र, आमचे सरकार असेपर्यंत स्थगिती आली नाही. रविवारी देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्टपणे आश्वासन दिले. मराठा समाजाला आरक्षण सरकार देईल. आम्ही पूर्ण ताकदीने त्यांच्या पाठिशी आहोत, असेही फडणवीस म्हणाले.

Edited by : Amol Jaybhaye

Ajit Pawar, Devendra Fadnavis News
Athawale On Cabinet Expansion : मंत्रिमंडळ विस्ताराचे काय झाले? आठवलेंनी करून दिली आठवण !

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com