Devendra Fadnavis News : राऊतांच्या टीकेला कवडीचीही किंमत न देता फडणवीसांनी पत्रकारांनाच केला 'हा' उलट प्रश्न; म्हणाले...

Sanjay Raut On PM Modi : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी बुलडाण्यातील सभेत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना औरंगजेबाशी केली होती.
Devendra Fadnavis, Sanjay Raut
Devendra Fadnavis, Sanjay RautSarkarnama
Published on
Updated on

Devendra Fadnavis Vs Sanjay Raut : राज्यात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. प्रत्येक पक्षाचे नेते विविध जिल्ह्यांचा दौरा करत आहेत. विविध ठिकाणी सभा घेत आहेत. यादरम्यान नेतेमंडळी आपल्या विरोधकांवर टीका करताना दिसत आहेत. अशातच महायुतीवर आणि पंतप्रधान मोदी आणि देशाचे गृहमंत्री अमित शाह यांच्यावर सातत्याने टीका करणारे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी बुलडाण्यातील सभेत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची तुलना औरंगजेबाशी केली होती.

बुलडाण्यातील जाहीर सभेत बोलताना राऊत (Sanjay Raut) म्हणाले होते, "यापुढे मोदी नव्हे तर औरंगजेब म्हणा" राऊतांच्या या वक्तव्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता, "राऊतांवर मी बोलावं का? माझी काहीतरी प्रतिमा ठेवा," असं म्हणत फडणवीसांनी पत्रकारांनाच उलट प्रश्न केला आणि यावर बोलणं टाळलं.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

माध्यमांशी बोलताना फडणवीस म्हणाले, "संजय राऊत कोण आहेत? त्यांच्यासारख्या माणसावर मी उत्तर द्यावं का? माझी काही तरी प्रतिमा ठेवा." या वेळी पत्रकारांनी त्यांना भाजप नेते हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) नाराज आहेत का? असं विचारलं असता ते म्हणाले, ते नाराज नाहीत, त्यांचे काही प्रश्न होते त्यांचे प्रश्न समजून घेत समाधान शोधण्याचा प्रयत्न केला असल्याचं फडणवीस म्हणाले.

तसेच महायुतीत मोहिते पाटलांच्या नाराजीबाबतचा प्रश्न विचारला असता, फडणवीस म्हणाले, "त्यांच्याशी आम्ही चर्चा करत आहोत. एकदा निर्णय झाला की आम्ही मोदीजींना पंतप्रधान करण्यासाठी प्रयत्न करतोय. त्यांच्याशी सर्वचजण बोलत आहेत. माझ्यासह प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) आणि मंत्री गिरीश महाजनही त्यांना भेटून आले आहेत." दरम्यान, आजच्या बैठकीत बूथ बांधणीवर चर्चा झाली असून, कार्यकर्त्यांना बूथ बांधणीची माहिती दिल्याची या वेळी बोलताना त्यांनी सांगितले.

R

Devendra Fadnavis, Sanjay Raut
Ajit Pawar Ahmednagar News : नगर राष्ट्रवादीत 'ऑल इज नॉट वेल', लंके सोडून जाण्याच्या तयारीत असतानाच...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com