Devendra Fadnavis News : 'देवाभाऊ'च्या जाहिरातीनं राष्ट्रीय ओबीसी महासंघात खळबळ

OBC Political News : राष्ट्रीय ओबीसी महासंघ अराजकीय संघटना असताना निवडणुकीच्या तोंडावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार व्यक्त करण्याची गरज काय होती असा सवाल महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन उपस्थित केला.
DCM Devendra Fadnavis
DCM Devendra Fadnavis Sarkarnama
Published on
Updated on

Nagpur News : विधानसभेची निवडणूक कुठल्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यापूर्वी महायुतीच्यावतीने भरमसाठ जाहिराती केल्या जात आहे. ठिकठिकाणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आभार व्यक्त करण्यासाठी 'धन्यवाद देवाभाऊ' असे फलक शहरात झळकत आहे.

मात्र, राष्ट्रीय ओबीसी (OBC) महासंघाच्यावतीने 'बहुजन हितासाठी, मी देवाभाऊच्या पाठी' या जाहिरातीमुळे महासंघात चांगलीच खळबळ उडाली आहे. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी महासंघाचा आणि जाहिराती संबंध नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. ज्या व्यक्तीने महासंघाच्या नावाचा परस्पर वापर केला त्याने माफी मागावी, अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल असाही इशारा देण्यात आला.

राष्ट्रीय ओबीसी महासंघ अराजकीय संघटना असताना निवडणुकीच्या तोंडावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे आभार व्यक्त करण्याची गरज काय होती असा सवाल महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन उपस्थित केला.

काहींनी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे यांच्याच निर्देशावरून जाहिरात दिली असल्याची शंका व्यक्त केली. त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली तर काही पदाधिकाऱ्यांनी अध्यक्ष राज्यात नाहीत, नागपूरमध्ये परल्यावर आपली भूमिका जाहीर करतील करतील असे सांगून बाजू सावरली. हे बघता महासंघातच या जाहिरातीवरून मतभेद असल्याचे दिसून येते.

DCM Devendra Fadnavis
Nagpur Congress : 'सर्व काही ठरल्यावर मुलाखतींचा फार्स कशाला?' ; नागपुरात काँग्रेसच्या इच्छुकांमधून नाराजीचा सूर!

राष्ट्रीय ओबीसी महासंघ अराजकीय संघटना आहे. सर्वच राजकीय पक्षाचे कार्यकर्ते महासंघात आहेत. आम्ही फक्त ओबीसी समाजाचे हक्क व अधिकारासाठी लढा देतो अशी भूमिका वारंवार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे मांडत असतात. राज्यात आणि केंद्रात कोणाचे सरकार आहे हे आम्ही बघत नाही. आमच्या मागण्या सरकार या नात्याने त्यांच्याकडे मांडत असतो.

आमच्या मागण्या मान्य करणाऱ्यांचे आभार व्यक्त करणे आमचे कर्तव्य आहे. आभार व्यक्त करताना आम्ही राजकीय पक्ष कोणता हे बघत नाही, असे यापूर्वी अनेकदा तायवाडे यांनी स्पष्ट केले. पण आज देवेंद्र फडणवीस यांचे आभार व्यक्त केल्याने ओबीसी महासंघाच्या अनेक पदाधिकाऱ्यांना चांगलेच खटकले आहे.

DCM Devendra Fadnavis
Sharad Pawar: 'तुम्ही काही काळजी करू नका, 84 हो किंवा 90, हे म्हातारं काही..'; शरद पवारांचा महायुतीला इशारा

संघटना अराजकीय असताना निवडणूक जवळ येऊन ठेपली असताना जाहिरातीच्या माध्यमातून आभार मानण्याचे कारण काय असा सवाल अनेकांनी पत्रकार परिषद घेऊन उपस्थित केला. कोणीतरी ओबीसींची दिशाभूल करण्यासाठी खोडसाळपणा केला की जाणीवपूर्वक जाहिरात दिली याचा शोध घ्यावा अशी मागणी त्यांनी केली.

आम्ही शोध घेणारच आहोत. यात संघटनेचे पदाधिकारी दोषी आढळल्यास याचही फैसला करू असे सांगण्यात आले. गरज भासल्यास अध्यक्षाचा राजीनामा मागितला जाईल असेही यावेळी सांगण्यात आले. ही जाहिरात परस्पर देण्यात आली. महासंघाच्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेण्यात आले नाही. महासंघाचा जाहिरातीशी संबंध नसल्याचेही यावेळी जाहीर करण्यात आले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com