Devendra Fadnavis on Sharad Pawar : 'शरद पवारांसारख्या मोठ्या नेत्याला..' ; देवेंद्र फडणवीसांकडूनही पलटवार!

Devendra Fadnavis on Malvan Shivaji Maharaj statue issue : राजकोट किल्ल्यावरील शिवरायांचा पुतळा कोसळ्याच्या घटनेवरून शरद पवारांनी राज्य सरकावर टीका करत, आरोप केले होते.
Devendra Fadnavis on Sharad Pawar
Devendra Fadnavis on Sharad PawarSarkarnama
Published on
Updated on

Devendra Fadnavis at Nagpur : मालवनमधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याने, राज्यातील राजकीय वातावरण कमालीचं तापलं आहे. शिवाय, समाजातूनही या घटनेवर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. विरोधकांनी तर घटनेवर राज्य सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप करत, जोरदार टीकाही सुरू केली. अनेक ठिकाणी आंदोलनं होत आहेत.

याच दरम्यान आज महाविकास आघाडीने पत्रकारपरिषद घेत या घटनेचा निषेध नोंदवला. तसेच यावेळी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही राज्य सरकारवर टीका केली. ज्यावर उपमुख्यमंत्री फडणवीसांनी(Devendra Fadnavis) नागपूर येथे माध्यमांना प्रतिक्रिया देताना प्रत्युत्तर दिलं.

फडणवीस म्हणाले, खरं म्हणजे, 'शरद पवार(Sharad Pawar) ज्येष्ठ नेते आहेत. त्यांना हे देखील माहीत आहे, की हा पुतळा नौदलाने तयार केला आहे हा काही राज्य सरकारने तयार केलेला नाही. एखाद्या ठिकाणी भ्रष्टाचाराचं तारतम्य आणि दुसऱ्या ठिकाणी नाही. असं कसं म्हणता येईल?'

Devendra Fadnavis on Sharad Pawar
Sharad Pawar : शरद पवारांचे फडणवीसांना प्रत्युत्तर; शिवाजी महाराजांच्या ‘त्या’ शिक्षेची आठवण करून दिली...

तसेच, 'भ्रष्टाचार कुठेच नको. भ्रष्टाचाराला आपला विरोधच असला पाहीजे. शरद पवारांचाही विरोध असला पाहिजे. ते अशाप्रकारे वक्तव्य देत असतील तर मला आश्चर्य वाटतं, की ते भ्रष्टाचाराला समर्थन देतात का मग? इतर ठिकाणी. मला असं वाटतं हे जे राजकीय वक्तव्यं आहेत. ते केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केले जात आहेत. शरद पवारांसारख्या मोठ्या नेत्याला अशाप्रकारची वक्तव्यं करणं शोभत नाही.' असंही फडणीस म्हणाले.

शरद पवार काय म्हणाले होते? -

पुतळा कोसळल्याप्रकरणी राजकारण करू नये, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. याबाबत विचारले असता त्याला प्रत्युत्तर देताना पवारांनी 'यात राजकारण कसलं', असा प्रतिसवाल केला. शिवाजी महाराजांच्या काळात एक गोष्ट लोकांना भावल्याचे सांगत पवारांनी रांझे गावचा पाटलाला महाराजांनी दिलेल्या शिक्षेचा प्रसंगही सांगितला.

तसेच 'कुणी सांगतंय वाऱ्याचा वेग होता. आणखी काही कारणे सांगितली जात आहेत. पंतप्रधानांच्या हस्ते पुतळ्याचे अनावरण झाले. आज त्याठिकाणी भ्रष्टाचार किती टोकाला पोहचला आहे. कुठे भ्रष्टाचाराची भूमिका घेऊ नये, याचे तारतम्यही सरकारमध्ये नाही.', अशा शब्दांत पवारांनी सत्ताधाऱ्यांना सुनावले.

(Ediyted by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com